IPL 2025: ‘रोहित + चॅम्पियन्स ट्रॉफी = मुंबईची आयपीएल ट्रॉफी’ हे समीकरण पुन्हा एकदा जुळणार का?

IPL 2025 Qualifier 2 MI vs PBKS: चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली की मुंबई इंडियन्सचे आयपीएल जेतेपद ठरलेले? रोहित शर्माचा ‘लकी योगायोग’ पुन्हा चर्चेत!



नवी दिल्ली : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी सामना सुरु होण्यापूर्वीच एक जबरदस्त बातमी समोर आली आहे. पंजाबविरुद्धच्या ‘क्वालिफायर २’ सामन्याआधी रोहित शर्माशी जोडलेला एक भन्नाट योगायोग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, जो चाहत्यांच्या आशा पुन्हा पल्लवित करत आहे.


गमतीशीर बाब म्हणजे रोहित शर्मा यंदा मुंबई इंडियन्सचा कर्णधार नसतानाही, त्यांच्या उपस्थितीत एक असा इतिहास पुन्हा उलगडतोय, जो मुंबईसाठी ‘लकी चार्म’ ठरत आला आहे. रोहितच्या नेतृत्वात भारताने नुकतीच २०२५ ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. आणि ज्या-ज्या वर्षी भारताने ही ट्रॉफी जिंकली, त्या-त्या वर्षी रोहित शर्माने आयपीएल ट्रॉफीवरही आपलं नाव कोरलंय, हे आता संपूर्ण सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागलं आहे.



२००९ मध्ये डेक्कन चार्जर्सकडून रोहितने आयपीएल जिंकले, त्याच वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफी झाली. २०१३ मध्ये भारताने धोनीच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी उचलली आणि रोहितने मुंबईसाठी पहिले आयपीएल जेतेपद मिळवलं. २०१७ ला भारत फायनलमध्ये हरला, पण मुंबई मात्र विजयी झाली. आणि आता २०२५ – रोहितने भारतासाठी ट्रॉफी जिंकली आहे... म्हणजेच?


‘रोहित + चॅम्पियन्स ट्रॉफी = मुंबईची आयपीएल ट्रॉफी’ हे समीकरण पुन्हा एकदा जुळणार का? सामना सुरू होण्याआधीच हे योगायोग पाहून मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचं आणि अपेक्षांचं वातावरण आहे.


कधी कधी आकडे, इतिहास आणि योगायोगदेखील सामना जिंकवू शकतात... आणि यंदा तर रोहितच्या नशिबाची हवा मुंबईच्या दिशेने वाहतेय. यामुळे रोहित शर्माचा हा योगायोग मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना नक्कीच सुखावणारा असेल. त्यामुळे हा योगायोग पुन्हा यावर्षी पाहायला मिळणार की नाही, याकडे तमाम क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

दक्षिण आफ्रिका सर्वबाद १५६, भारत एक बाद ३७

कमी प्रकाशामुळे खेळ पहिल्या दिवसाचा खेळ लवकर संपवला कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन

लक्ष्य सेन जपान मास्टर्सच्या उपांत्य फेरीत

कुमामोतो : भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने शुक्रवारी माजी विश्वविजेता सिंगापूरच्या लोह कीन यूवर

ईडन गार्डन्समध्ये बुमराहचा ‘फायर-फाईव्ह’; दक्षिण आफ्रिका पहिल्याच दिवशी मैदानाबाहेर

कोलकाता : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने ईडन गार्डन्सवर रंगलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण

IND vs SA 1st Test : बुमराहचा 'डबल धमाका'! दक्षिण आफ्रिकेचे टॉप ३ फलंदाज तंबूत; जसप्रीत बुमराहच्या हाती २ महत्त्वाच्या विकेट्स!

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची मालिका आयोजित करण्यात आली आहे. या मालिकेचा पहिला सामना

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पहिला कसोटी सामना, भारत गोलंदाजी करणार

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला आज कोलकात्यातील ईडन गार्डन्समध्ये

'इडन गार्डन्स' वर आजपासून द.आफ्रिका विरुद्ध भारत कसोटी !

पहिल्या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हन निश्चित ; शुभमनने दिले संकेत मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात