मुसळधारांमुळे देहरंग धरण ‘तुडुंब’

पनवेलकरांचा पाणीटंचाईचा प्रश्न मिटला


पनवेल : पनवेल शहराची तहान भागविणाऱ्या देहरंग धरण क्षेत्रात मुसळधारांमुळे धरण तुडुंब भरले आणि पनवेलकरांचा पाणीप्रश्न मिटला. पनवेलकर मार्च महिन्यापासून आठवड्याला एक दिवसाच्या पाणीकपातीचा सामना करत आहे. ही पाणीकपात जून महिन्यापर्यंत सुरू राहणार होती. मात्र धरण तुडुंब झाल्याने सोमवारपासून पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय पनवेल महापालिका आयुक्तांनी घेऊन पनवेलकरांना दिलासा दिला आहे. मे महिन्यात पहिल्यांदाच एवढा पाऊस पडल्यामुळे धरण मे महिन्यातर आकंठ भरण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे येथील स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले.



दरवर्षी मोसमाच्या पावसानंतर जून अखेरपर्यंत देहरंग धरण तुडुंब भरुन वाहू लागते. या धरणाची क्षमता ३.१२५ घन लक्ष मीटर आहे. या धरणातून पनवेल शहराला दररोज १६ दश लक्ष लीटर पाणी पुरवठा केला जातो. पनवेलकरांची तहान भागविण्यासाठी ३२ दश लक्ष लीटर पाण्याची गरज आहे.


महापालिका प्रशासन देहरंग व्यतिरिक्त महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजेपी) आणि औद्योगिक विकास महामंडळाकडून उसनवारीने पाणी घेऊन शहराची तहान भागवते. मुसळधारांमुळे एका दिवसात २९६ मिलीमीटर पाऊस पनवेल परिसरामध्ये पडल्याने धरण तुडुंब भरुन वाहू लागले.


देहरंग धरणातील पाणी जून महिन्यापर्यंत पनवेल शहरासाठी घेता यावे यासाठी महापालिका प्रशासनाने मार्च महिन्यापासून दिवसाला ४ ते ५ दश लक्ष लीटर पाणी घेण्याचे नियोजन केले. पाण्याच्या नियोजनामुळे मार्च महिन्यापासून पाणी कपात लागू केल्यामुळे एमजेपीकडून वाढीव पाणी पुरवठा पनवेल शहराला केला जात होता. मुसळधार धरण क्षेत्रात कोसळल्यामुळे हा पाऊस पनवेलकरांसाठी आनंदवार्ता घेऊन येणारा ठरला.

Comments
Add Comment

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान वाहतूक सुरू, पहिल्या विमानाचं जोरदार स्वागत

पनवेल : रायगड जिल्ह्यात असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपासून (गुरुवार २५ डिसेंबर २०२५)

सिडको-नैना क्षेत्रातील घनकचऱ्याचे व्यवस्थापन

पनवेल तालुक्यातील ४६ गावांचा प्रश्न मार्गी लागणार पनवेल : पनवेल तालुक्यामधील सिडको व नैना अधिसूचित क्षेत्रातील

कर्जतमध्ये सुधाकर घारे यांचे जोरदार कमबॅक

नितीन सावंतांना सोबत घेऊन थोरवे आणि लाड यांना धक्का कर्जत : येथील नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत परिवर्तन विकास

राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला अबाधित

विकासकामांना ग्रामस्थांनी निवडले रुपेंद्र मळेकर रोहा : रोहा नगरपरिषद निवडणुकीत मोठ्या चुरशीच्या झालेल्या

उबाठाशी युती राष्ट्रवादीच्या फळाला आली

मुरुडकरांनी जुन्यांना नाकारले तरुणांकडे धुरा! उदय खोत नांदगाव मुरुड : मुरुड नगरपरिषदेची निवडणूक

आपली पोरं सांभाळू शकले नाहीत, ते मुंबई काय सांभाळणार?

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली