कोस्टल रोडचा भुयारी मार्ग सुरू, दादर - प्रभादेवीहून नरिमन पॉइंटला झटपट जाता येणार

  71

मुंबई : कोस्टल रोड अर्थात किनारी रस्त्याच्या अंतिम टप्प्यातील जे. के. कपूर चौक येथून सुरू होणाऱ्या भुयारी मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. आता कोस्टल रोडचा भुयारी मार्ग चारचाकी वाहने आणि प्रवासी बस यांच्यासाठी खुला झाला आहे. भुयारी मार्गात दुचाकी, तीनचाकी आणि अवजड वाहनांना प्रवेश नाही. प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे वरळी सी लिंकच्या वरळी टोकापर्यंत १०.५८ किमीचा कोस्टल रोड अर्थात किनारी रस्ता प्रवासासाठी उपलब्ध आहे. यामुळे दादर - प्रभादेवी पट्ट्यातून नरिमन पॉइंट तसेच वांद्रे वरळी सी लिंकच्या दिशेने जाणारी वाहतूक वेगवान होणार आहे. हा मार्ग सकाळी सात ते रात्री बारा वाजेपर्यंत प्रवासाकरिता उपलब्ध असेल.

भुयारी मार्ग जे. के. कपूर चौक ते कोस्टल रोड, तसेच सागरी सेतूला (सी लिंक) जोडला गेला आहे. त्यामुळे खान अब्दुल गफ्फार खान मार्गावरुन सी लिंकला जाणारी वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. भुयारी मार्गातून दोन मार्ग निघतात. त्यातील एक मार्ग हा कोस्टल रोडकडे जाणारा तर दुसरा मार्ग हा वरळी सी लिंककडे जाणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. प्रवासाच्या वेळेत बचत होणार आहे.
Comments
Add Comment

ढोल-ताशांच्या गजरात गणेशमूर्तींचे आगमन

मुंबई : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असून मुंबईतील अनेक गणेश मंडळांनी मूर्ती मंडपात नेण्यास सुरुवात केली

महाराष्ट्रात गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा मान; घरबसल्या दर्शनासाठी विशेष पोर्टल सुरू

मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सव, घरगुती गणेशोत्सव, महाराष्ट्रातील गणेशोत्सवाला आता राज्याने प्रथमच महाराष्ट्र

महाराष्ट्रातील १ कोटी बहीणींना लखपती दीदी करणार

मुंबई : लखपती दीदींसाठी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली महाराष्ट्रात

मुंबई महापालिकेची प्रभाग रचना जाहीर

येत्या ०४ सप्टेंबरपर्यंत नागरिकांना नोंदवता येणार हरकती, सूचना मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक

माजी बँक अध्यक्ष 'फरार' घोषित!

मुंबई: १२२ कोटी रुपयांच्या गैरव्यवहार घोटाळ्याप्रकरणी एस्प्लेनेड न्यायालयाने 'न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह

भाजपकडून गणेश भक्तांसाठी मोफत प्रवास!

मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी मुंबई भाजपने ३५० मोफत बसेस आणि विशेष रेल्वे सेवांची