माणेरे गावातील दोन बोगस डॉक्टरांवर अखेर गुन्हा दाखल

केडीएमसीच्या वैद्यकीय आरोग्य विभागाची कारवाई


कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने दोन बोगस डॉक्टरांविरोधात कारवाई केली आहे. श्रीकृष्ण कुमावत व देवेंद्र पुजारी अशी त्यांची नावे आहेत. माणेरे येथील या दोन बोगस डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्यास तब्बल सव्वा वर्षाचा कालावधी लागल्याने केडीएमसीच्या आरोग्य विभागाचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर आला असल्याचे दिसत आहे.



माणेरे गावातील साई क्लिनिक येथे दोन अनधिकृत वैद्यकीय व्यावसायिकांविरोधात प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने महापालिकेच्या बोगस डॉक्टर शोध पथकाने धाड टाकली. यावेळी श्रीकृष्ण कुमावत व देवेंद्र पुजारी हे व्यक्ती वैद्यकीय पात्रता नसतानाही रुग्णांवर उपचार करत असल्याचे आढळून आले. तपासात असे निष्पन्न झाले की श्रीकृष्ण कुमावत यांच्याकडे कोणतीही वैद्यकीय शैक्षणिक पात्रता नाही. तर देवेंद्र पुजारी यांच्याकडे इलेक्ट्रो होमिओपथी ही अर्हता असून, ती पद्धत शासनमान्य नसल्यामुळे अशा अर्हताधारकांना वैद्यकीय व्यवसाय करण्याची परवानगी नाही. या दोघांविरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात केडीएमसी मुख्य आरोग्य आधिकारी यांनी दिलेल्या तक्रीरीनुसार पोलिसांनी महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९६१ मधील कलम ३३ व ३६ तसेच भारतीय न्यायसंहिता कायदा २०२३ मधील कलम ३१८ व ३१९ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास विठ्ठलवाडी पोलीस करत आहेत.


केडीएमसी मुख्य आरोग्य आधिकारी डॉ. दिपा शुक्ला यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, “माणेरे येथील दोन बोगस डॉक्टरांविरोधात १९ मे२०२५ रोजी विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला गेला असून याप्रकरणी पुनश्च व्हिजिट, मेडिकल काँन्सिलकडे कागदपत्र तपासणी यामुळे हा गुन्हा दाखल करण्यास सव्वा वर्षाचा विलंब झाला”, असे म्हटले आहे.

Comments
Add Comment

मुंबईसह विविध ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश

ठाणे : मुंबईतील वाकोला प्रभाग क्रमांक ९१ चे उबाठा गटाचे माजी नगरसेवक सगुण नाईक त्यांची कन्या युवासेना कॉलेज कक्ष

नवीन वर्षात कल्याणवासियांची होणार वाहतूक कोंडीतून मुक्तता

कल्याण : कल्याण - डोंबिवली महापालिकेची स्मार्ट सिटी प्रकल्पात निवड झाल्यानंतर कल्याण स्टेशन परिसरात वाहतूक

बदलापुरात आढळला दुर्मीळ मलबार पिट वायपर प्रजातीचा साप

बदलापूर : बदलापुरातील आदर्श विद्यामंदिर शाळेबाहेरील पदपथावर एक सर्प नागरिकांना निदर्शनास आल्यावर 'स्केल्स अँड

ठाण्याच्या मेट्रोचे डिसेंबरमध्ये होणार उद्घाटन, 'या' मार्गावर धावणार मेट्रो

ठाणे : ठाणे शहरातील पहिली मेट्रो सेवा डिसेंबर २०२५ मध्येच सुरू होणार आहे. उद्घाटनाची तारीख लवकरच जाहीर होणार आहे.

प्रायोगिक तत्वावर बदलापूर-अक्कलकोट बससेवा

बदलापूर  : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बदलापूर ते अक्कलकोट दरम्यान थेट बससेवा सुरु केली आहे.

भिवंडीत शनिवारी २४ तास पाणीपुरवठा बंद

भिवंडी (वार्ताहर) : जुनी भिवंडीला पाणीपुरवठा करणारी मानसरोवर येथील मेन लाईन शिफ्टींगचे काम हाती घेण्यात येणार