लवकरच धर्मांतर बंदी, लव्ह जिहाद कायदा अस्तित्वात येणार : गोपीचंद पडळकर

जामखेड : "लवकरच धर्मांतर बंदी, लव्ह जिहाद कायदा अस्तित्वात येणार आहे. यातील धर्मांतर बंदी कायदा अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने करायला हवा. तर लव्ह जिहाद विरोधी कायदा संभाजी महाराजांच्या नावाने करावा", अशी मागणी भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. अहिल्यानगर येथे बोलताना त्यांनी ही मागणी केली आहे. तसेच यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणावर देखील भाष्य केले आहे.


गोपीचंद पडळकर म्हणाले, लवकरच धर्मांतर बंदी, लव्ह जिहाद कायदा अस्तित्वात येणार आहे. यातील धर्मांत बंदी कायदा अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने करायला हवा. तर लव्ह जिहाद विरोधी कायदा संभाजी महाराजांच्या नावाने करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.


लव्ह जिहादच्या अनेक घटना गेल्या काही महिन्यांत उघडकीस आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर गोपीचंद पडळकर यांनी ही मागणी केली आहे.गोपीचंद पडळकर ओबीसी आरक्षणाविषयी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले आहे. ते म्हणाले, मी आज काहीही मागणार नाही पण आरक्षणाचा विचार सर्वांच्या मनात आहे. ओबीसींचे गेलेले आरक्षण एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी टिकवले. बाजीप्रभूप्रमाणे आम्ही सगळे प्रामाणिक आहोत. जे लढायचे ते समोरासमोर लढणारे आम्ही आहोत.



पुढे बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले, अहिल्यादेवी यांचे नाव भाषणात सांगणारे पण कृतीशून्य असलेले राजकारणी वेगळे आहेत. देवेंद्र फडणवीस सत्तेत आले आणि राज्यभर अहिल्यादेवींची जयंती साजरी व्हायला लागली. आम्ही कायम आंदोलन करत होतो पण कोणी दखल घेत नव्हते.


देशात होळकर घराण्यावर काही राजकारण्यांनी अन्याय केला, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. केवळ एका वर्षात या सरकारने अहमदनगरचे नाव अहिल्यानगर असे केले. १७७० मध्ये अहिल्यादेवी यांनी काशी विश्वेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यानंतर मोदीजींनी त्याच मंदिराचा जीर्णोद्धार केला. चोंडी येथे सभामंडप मिळवण्यासाठी १० हेलपाटे घातले पण निधी लवकर मिळाला नाही.


पण देवेंद्र फडणवीस यांनी एका झटक्यात ७०० कोटी रुपयांचा निधी चोंडीसाठी दिला. अहिल्यादेवी यांना ३०० वर्षानंतर न्याय मिळाला.

Comments
Add Comment

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या मत्स्यव्यावसायिकांना आधार देणार

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह मत्स्यव्यवसायालाही

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग