रायगड जिल्ह्यात ऐन पावसाळ्यात पाणीटंचाई

  38

जिल्हा परिषदेकडून टँकरने पुरवठा बंद


नागरिकांवर पाणी विकत घेण्याची वेळ


अलिबाग : मे महिन्यात आतापर्यंतचा सर्वाधिक मुसळधार पाऊस पडलेला असला, तरी रायगड जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांतील नागरिकांना आजही पिण्यासाठी विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अहवालानुसार, शनिवारी (दि. २४) ४३ गावे आणि २४२ वाड्यांमधील एकूण एक लाख १३ हजार नागरिकांना पाणीटंचाई जाणवत होती. यासाठी प्रशासनाकडून ४२ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता; मात्र मुसळधार पावसात सर्व टँकर बंद करण्यात आले आहेत.


पाणी वाहून गेल्याने नैसर्गिक पाणवठे पाऊस थांबताच कोरडे पडतात, तर ज्या पाणवठ्यांमध्ये पाणी आहे, ते पिण्यायोग्य नसल्याने ६० टक्के टंचाईग्रस्त गावे अद्याप तहानलेलीच आहेत. त्यामुळे पिण्यासाठी जारद्वारे विकतचे पाणी घेण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नसतो. दरवर्षी पावसाला सुरू झाल्यावरही टंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जातो. यंदा मे महिन्यात झालेल्या पावसाने नागरिकांना काहीसा दिलासा दिला; मात्र हे पाणी वाहून गेल्याने टंचाईग्रस्त गावांना पुन्हा टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. पाऊस सुरू होताच जिल्हा परिषदेने टँकर बंद करण्याचा निर्णय घेतल्याने नागरिकांना पदरमोड करून जारमधील पाणी विकत घ्यावे लागत आहे.


पेण तालुक्यातील शिर्कीचाळ, दादर, रावे गावांत, अलिबाग तालुक्यातील मिळकतखार, सारळ या समुद्रकिनाऱ्यालगतच्या गावांची टंचाई कायम असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सर्वाधिक पाणीटंचाई महाड तालुक्यात जाणवत आहे. मे महिन्यात येथील बहुतांश पाणवठे आटले असून, जलजीवनच्या योजनाही कुचकामी ठरल्या आहेत. शनिवारपर्यंत महाड तालुक्यात ११ गावे आणि ११६ वाड्यांना, तर पनवेलमध्ये चार गावे आणि १४ वाड्यांना टंचाई जाणवत होती.


जिल्हा परिषदेच्या पाणीटंचाई आराखड्यानुसार ज्या गावातून किंवा लोकवस्तीतून पाण्याच्या टँकरची मागणी होईल, त्याठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याच्या सुचना आहेत; मात्र सध्या पडत असलेल्या पावसात दुर्गम भागात टँकर जाऊ शकत नाहीत.


काही ठिकाणी चिखल झाल्याने टँकर घेऊन जाण्यास चालक तयार नाहीत, तर बहुतांश ठिकाणचे जलस्रोत अद्याप गढूळ आहेत. काही टँकरचालकांना शुद्ध पाणी कोणत्या जलस्रोतातून भरायचा असा प्रश्न पडत आहे. रायगड जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये पाणीटंचाई नियंत्रणात आहे. सुधागड, पाली, रोहा, म्हसळा, मुरूड, तळा या तालुक्यांमध्ये आजघडीला एकही गाव किंवा वाडी टंचाईग्रस्त नाही, असा अहवाल जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने दिलेला आहे, तर यापूर्वी टँकरमुक्त तालुका म्हणून उल्लेख केला जात असलेल्या अलिबाग तालुक्यातही दोन टँकरने पाणीपुरवठा करावा लागला आहे.



बाटलीबंद पाण्याला अधिक पसंती


पावसातील गढूळ, दूषित पाण्यामुळे आजार होऊ शकतात. यामुळे डॉक्टरांकडून पाणी गरम करून पिण्याचा सल्ला दिला जात आहे; परंतू प्रवासात पाणी गरम करणे शक्य नसल्याने नागरिकांकडून बाटलीबंद पाण्याला अधिक पसंती दिली जात आहे. स्वयंपाक किंवा कुटुंबीयांना पिण्यासाठी बाटलीबंद पाणी परवडणारे नसते, यामुळे नाईलाजास्तव जारमधील पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्यामुळे जारमधून पाणी विकणाऱ्यांच्या धंद्यात तेजी आहे. पूर्वी एका जारसाठी १०० रुपये डिपॉझिट आणि प्रत्येक रिफिलसाठी ४० रुपये द्यावे लागायचे आता ते ५० रुपये करण्यात आले आहे.


सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुढील अनेक दिवसांचा पाणीसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे टँकरने पाणीपुरवठा करणे थांबवले आहे; जिल्ह्यातील अधिकाऱ्यांशी बोलूनच हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या गावांत पिण्याच्या पाण्याची समस्या असेल त्या गावांत पुन्हा टँकर पुरवठा करण्यात येईल.
- संजय वेंगुर्लेकर, (कार्यकारी अभियंता, रायगड जिल्हा परिषद)


Comments
Add Comment

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

माणगावमध्ये वाहतूककोंडी, ठिकठिकाणी पोलिस तैनात

मुंबईमधून गणपतीला कोकणात जाणाऱ्या गाड्यांमुळे सलग दुसऱ्या दिवशी माणगाव शहरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली

गणपतीला कोकणात जाण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकांवर गर्दी

आज रविवार असल्याने गणपतीला कोकणात जाण्यासाठी गर्दी पाहायला मिळत आहे. मुंबई आणि नवी मुंबईतील विविध ठिकाणाहून

नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर होईना, इच्छुकांची कोंडी सोडवेना

माथेरान : माथेरान नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत यावेळीसुद्धा नगराध्यक्षपदाची निवडणूक ही थेट जनतेच्या

पनवेल-चिपळूणदरम्यान 6 अनारक्षित विशेष रेल्वे गाड्या

कोकणात जाण्यासाठी गणेशोत्सवाच्या काळात रेल्वे गाड्यांमध्ये वाढणारी भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेऊन भाविक

"मोदी एक्प्रेससने गावाक जाऊचो आनंद काय वेगळोच" कोकणकरांना घेऊन पहिली मोदी एक्सप्रेस सुटली

गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबई आणि मुंबई परिसरातील कोकणकरांना कोकणात जाण्यासाठी विशेष रेल्वे सुरु करण्यात