Tiger Attack Video: वाघासोबत सेल्फी काढणं तरुणाला भोवलं, अखेर अघटित घडलं

थायलंडच्या फुकेत येथे भारतीय पर्यटकावर वाघाचा हल्ला


फुकेत: सोशल मिडियावर अलीकडेच एक भयंकर व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक भारतीय तरुण वाघाला घेऊन फिरताना दिसतो, दरम्यान तो वाघाच्या पाठीवरून हात फिरवतो, आणि त्याच्यासोबत सेल्फी काढणार तोच वाघ त्या व्यक्तीवर हल्ला करतो. हा व्हिडिओ पहाणाऱ्यांचा थरकाप उडवतो. मुळात, हा व्हिडिओ थायलंडच्या फुकेत येथील टायगर किंग्डममधला आहे,

थायलंडच्या फुकेत येथे जगभरातून अनेक पर्यटक टायगर किंग्डमला भेट देत असतात. याठिकाणी वाघाला प्रत्यक्ष समोरासमोर पाहता येतं. वाघाला हात लावता येतो आणि फोटोही काढता येतो. मात्र, अलीकडे व्हायरल झालेला व्हिडिओ पाहता टायगर किंग्डममधील वाघासोबत सेल्फीच काय तर त्याच्या जवळपास जाण्याचादेखील कोणीच धाडस करणार नाही.

एक्स (पूर्वीचा ट्विटर) वर सिद्धार्थ शुक्ला नामक व्यक्तीने सदर घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ इतका भयावह आहे की, ज्या व्यक्तीच्या अंगावर वाघाने हल्ला केला, त्याच्या किंकाळ्या ऐकूनच थरकाप उडेल.

पहा व्हिडिओ-


 



 

व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले, "थायलंडमध्ये एका भारतीय पर्यटकावर वाघाने हल्ला केला. हे जगातले असे ठिकाण आहे, जिथे वाघांना पाळीव प्राण्यांप्रमाणे वागवले जाते. पर्यटक त्यांच्याबरोबर सेल्फी काढू शकतात, त्यांना अन्न भरवू शकतात इत्यादी.."

हल्ला झालेला व्यक्ती किरकोळ जखमी


हा इतका भीतीदायक प्रसंग आहे, की हल्ला झालेला व्यक्ति जीवंत आहे का? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. या व्हिडिओच्या पोस्टखाली अनेकांनी त्याबद्दल विचारले देखील. यावर शुक्ला यांनी उत्तर देताना म्हटले की, ज्यावर हल्ला झाला तो व्यक्ती किरकोळ जखमी असून त्यावर उपचार सुरू आहेत.
Comments
Add Comment

Afghan Foreign Minister Muttaqi India Visit : अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री भारतात! संबंध दृढ करण्यावर दोन्ही देशांचा भर

नवी दिल्ली/काबूल : अफगाणिस्तानचे (Afghanistan) परराष्ट्र मंत्री अमीर मुत्ताकी भारत दौऱ्यावर असून नवी दिल्लीत दाखल झाले

सरकारी कामकाजावरील बंदीमुळे ‘नासा’चे कामकाज ठप्प !

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या सरकारी कामकाजावरील बंदीमुळे ‘नासा’ या अंतराळ संशोधन संस्थेचे कामकाज सध्या ठप्प झाले

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये भारताने पाकिस्तानला फटकारले!

संयुक्त राष्ट्रे : संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेमध्ये भारताने पाकिस्तानला खडे बोल सुनावले. पाकिस्तानचे वागणे

वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा

स्टॉकहोम : वैद्यकशास्त्रातील (मेडिसिन) २०२५ चा नोबेल पुरस्कार अमेरिकेच्या मेरी ई. ब्रंकॉ आणि फ्रेड रैम्सडेल तसेच

गाझातील सत्ता न सोडल्यास हमासची धुळधाण करू

डोनाल्ट ट्रम्प यांची ताकीद वॉशिंग्टन डीसी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझामधील

नेपाळमध्ये मुसळधार पाऊस; भूस्खलनात १८ जणांचा मृत्यू

काठमांडू(वृत्तसंस्था): नेपाळमधील कोशी प्रांतात शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या