महापेतील डम्पिंग ग्राऊंडवर पाणी साचल्याने थांबली गाळ वाहतूक

नवीन डम्पिंग ग्राऊंड म्हणून मुंब्रा येथे शोधली जागा


मुंबई : पावसामुळे आधीच नदीतील काढून ठेवलेला गाळ पाण्यात वाहून गेला, त्यातच डम्पिंग ग्राऊंडवर पाणी साचून दलदल निर्माण झाल्याने गाळ उचलण्यात होणारा विलंब लक्षात घेता अखेर मिठी नदीतील काढलेल्याची विल्हेवाट लावण्यासाठी नवीन डम्पिंग ग्राऊंडचा शोध घेण्यात आला आहे. त्यामुळे मिठी नदीतील गाळ हा महापे येथील डम्पिंग ग्राऊंड ऐवजी मुंब्रा येथील डम्पिंग ग्राऊंडवर टाकला जाणार असून गुरुवारी रात्रीपासूनच हा गाळ उचलण्यास सुरुवात करण्यात आली आहे.



मुंबई महापालिकेच्या वतीने मिठी नदीच्या सफाईसाठी तीन भागांमध्ये विभागून कंत्राट देण्यात आले आहे. या तीन भागांमध्ये कंत्राटदारांची निवड केल्यानंतर गाळ काढण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. मिठी नदीतील गाळ बाजूला काढून ठेवल्यानंतर तो पूर्णपणे सुकल्यानंतर हा गाळ महापालिकेच्या एआय सॉफ्टवेअरवर सर्व प्रकारची नोंदणी प्रक्रिया केल्यानंतर डंपरद्वारे महापे येथील एका गावात निश्चित केलेल्या महापे येथील डम्पिंग ग्राऊंडवर खाली केला जात आहे.

परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४८ तासांमध्ये गाळ उचलला जावा अशाप्रकारचे निर्देश दिले असले तरी प्रत्यक्षात डम्पिंग ग्राऊंडवर पाणी तसेच चिखलसदृश्य स्थिती निर्माण झाल्याने गाळ उचलून वाहून नेण्याची प्रक्रिया पूर्णपणे बंद पडली होती. परंतु, उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार अखेर मिठी नदीतील सर्व कंत्राटदारांनी अखेर नवीन डम्पिंग ग्राऊंडचा शोध घेतला आहे. त्यासाठी मुंब्रा येथील डम्पिंग ग्राऊंडची जागा निश्चित केली आहे. याठिकाणी गुरुवापासून पुन्हा गाळ टाकण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे मिठी नदीतील गाळ उचलण्याच्या कामाला शिथिलता आली होती, ते काम पुन्हा सुरु झाल्याने मिठी नदीच्या सफाई कामाला पुन्हा गती प्राप्त झाली.
Comments
Add Comment

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण

आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांची ग्वाही नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित पिकांच्या नुकसानीपोटी ७३ कोटी ९१

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार

मुंबई : महाराष्ट्रातील बारव आणि विहीरींचे जिल्हानिहाय सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य

कोट्यवधी ईपीएफओ सदस्यांसाठी आनंदवार्ता

आता बँकेसारख्या सुविधा लवकरच! मुंबई : देशातील कोट्यवधी ईपीएफओ सदस्यांसाठी आनंदवार्ता आहे. गेल्या काही

हार्बरवर साडेचौदा तासांचा ट्रॅफिक ब्लॉक

मुंबई : कुर्ला ते टिळकनगरदरम्यान वळण मार्गिकांच्या कामासाठी शनिवारी रात्री ११.०५ ते उद्या, रविवार दुपारी १.३५