आय प्रभागात रखडलेले रस्ता रुंदीकरण, गटारीचे काम सुरू

अतिरिक्त आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पथक सज्ज


कल्याण :कल्याण- डोंबिवली नगरपालिकेच्या आय प्रभागात गेल्या दोन वर्षांपासून रखडलेले रस्ता रुंदीकरण व गटारीचे काम अखेर सुरू करण्यात आले. अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे आणि उपायुक्त अवधूत तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त भारत पवार यांच्या पथकाने या कामास सुरुवात केली.


दरम्यान, या िठकाणी असलेल्या गटारांमुळे येथे पावसाळ्यात पाणी भरण्याचे प्रमाण वाढत होते. त्यामुळे अनेक िठकाणी पाणी साचून येथील इमारतींनाही या पाण्याचा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे ही कामे लवकर सुरु झाल्याने येथील रहिवाशांना नक्कीच िदलासा मिळाला आहे. कामाला सुरुवात करताना माणेरे गावातील काही गाळेधारक आणि स्थानिक नागरिकांकडून कामात अडथळा निर्माण करण्यात आला होता. त्याचबरोबर संबंधित भागात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. पोलीस प्रशासनाने परिस्थिती शांत ठेवण्याचा प्रयत्न केला, महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, तसेच मागील कृष्णानगरी चाळीमध्ये पावसाचे पाणी शिरू नये म्हणून महापालिकेने तत्काळ ११ गाळेधारकांवर निष्कासन कारवाई केली. यामध्ये अनधिकृत शेड, ओटे आणि अडथळा निर्माण करणारे साहित्य काढून टाकण्यात आले. त्यानंतर वादग्रस्त ठिकाणी जुनी गटार व्यवस्था शोधून काढण्यात आली.


कारण या गटारांचे पाणी कृष्णा नदीत सोडले जात होते. त्यामुळे याचा एक वेगळा परिणाम येथील रहिवाशांना सहन करावा लागत होता. त्यामुळे ही जुनी गटार व्यवस्था मुख्य नाल्याशी मार्किंगनुसार जोडण्यात आली. निष्कासन कारवाईनंतर रस्ता रुंदीकरण व गटारीचे काम त्वरित सुरू करण्यात आले असून, नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने संबंधित भागात रेडियम पट्ट्या व 'डेंजर' अशी चिन्हे लावण्यात आलेली आहेत. महापालिकेच्या या तातडीच्या आणि ठोस कारवाईमुळे गेली अनेक महिने रखडलेले महत्त्वाचे काम मार्गी लागले असून, लवकरच परिसरातील नागरिकांना सुधारित रस्ता आणि सांडपाणी निचरा सुविधांचा लाभ
मिळणार आहे.

Comments
Add Comment

डोंबिवलीत १०७ तितर पक्ष्यांचा मृत्यू

डोंबिवली : डोंबिवली पूर्व येथील मोठगाव–ठाकुर्ली सातपुल परिसरात आज अचानक १०७ तितर पक्षी मृतावस्थेत आढळले आहेत.

भिवंडी-निजामपूर पालिका आणि एमसीईडी यांच्यात सामंजस्य करार

भिवंडी : भिवंडी निजामपूर शहर पालिका आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) यांच्यात शहरातील महिलांसाठी

भाईंदरमध्ये मराठी माणसाला घर देण्यास नकार !

बिल्डर लॉबीची अजब वागणूक भाईंदर : मराठी विरुद्ध अमराठी वादाचे भाईंदरमध्ये पडसाद उमटले आहेत. भाईंदरमध्ये एका

कल्याण - डोंबिवलीतील विकासकामांसाठी निधी उपलब्ध

डोंबिवली: कल्याण-डोंबिवलीतील कामांना गती देण्यासाठी राज्य नगर विकास विभागाच्या माध्यमातून तब्बल १६ कोटी

MCCL : डोंबिवलीत क्रिकेटचा महाधमाका!

डोंबिवली - डोंबिवली जिमखाना ग्राउंडवर यंदा क्रिकेट आणि ग्लॅमरचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे. मराठी मनोरंजन

मीरा भाईंदर होणार देशातील पहिले फ्री वायफाय शहर

भाईंदर (वार्ताहर) : मीरा-भाईंदर शहरातील नागरिकांना विनामूल्य वायफाय सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. १५ डिसेंबर