गुजरात टायटन्सचा राशिद खान IPL 2025 मधील सर्वाधिक महागडा आणि अयशस्वी गोलंदाज

चंदिगड : गुजरात टायटन्सचा राशिद खान आयपीएल २०२५ मधील सर्वाधिक महागडा आणि अयशस्वी गोलंदाज ठरला. आयपीएल २०२५ साठी गुजरात टायटन्सने राशिद खानला १८ कोटी रुपये मोजून रिटेन केले होते. पण राशिदने आयपीएल २०२५ मध्ये अपेक्षित कामगिरी केली नाही.

राशिद खानने आयपीएल २०२५ मध्ये १५ सामन्यांत ५५ षटके टाकली, ५७.११ च्या सरासरीने ५१४ धावा देत फक्त नऊ बळी घेतले. यंदाच्या आयपीएलमध्ये प्रतिस्पर्धी संघांच्या फलंदाजांनी राशिदच्या गोलंदाजीवर ३३ षटकार मारले.

एलिमिनेटर सामन्यात गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स आमनेसामने होते. या सामन्यात मुंबईचा २० धावांनी विजय झाला आणि गुजरातचे आयपीएल २०२५ मधील आव्हान संपुष्टात आले. चंदिगडमध्ये झालेल्या एलिमिनेटरमध्ये राशिदने चार षटकांत ३१ धावा दिल्या. या महत्त्वाच्या सामन्यात त्याला एकही बळी मिळवणे जमले नाही.यंदाच्या आयपीएलमधील राशिदचे हे अपयश गुजरात टायटन्सला भोवले. अफगाणिस्तानचा लेगस्पिनर राशिद खान आयपीएलच्या आधीच्या हंगामात प्रभावी ठरला होता. यामुळेच गुजरात टायटन्सने राशिद खानला १८ कोटी रुपये मोजून रिटेन केले होते. पण यावेळी राशिद अपेक्षित कामगिरी करण्यात अपयशी ठरला.
Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत