Vaishnavi Hagawane Case: पोलिसांकडून निलेश चव्हाणच्या घराची झडती, वैष्णवीचा पती, सासू आणि नणंदेचे मोबाईल अखेर सापडले

  72

पुणे: पुण्यातील मुळशी येथील विवाहीत तरुणी वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्या (Vaishnavi Hagawane Case) प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. वैष्णवीने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप आहे. मात्र ही आत्महत्या नसून, हत्या असल्याचा आरोप वैष्णवीच्या माहेरच्यांनी केला आहे. या प्रकरणात वैष्णवीचा नवरा, सासरा, सासू आणि नणंद यांना अटक करण्यात आली आहे. सध्या हे सर्वजण पोलिसांच्या ताब्यात आहे,  शिवाय याच प्रकरणातील आणखीन एक आरोपी निलेश चव्हाण (Nilesh Chavhan)च्या घराची आज तब्बल दीड तास पोलिसांकडून झडती घेण्यात आली. ज्यात अनेक महत्वपूर्ण वस्तू पोलिसांच्या हाती लागल्या आहेत.


वैष्णवी हगवणे हिचा पाती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि करिश्मा हगवणे या तीन आरोपींचे मोबाईल फोन निलेश चव्हाणकडे होते, ते आता जप्त करण्यात आले आहेत. गेली कित्येक दिवस आरोपींचे मोबाईल फोन पोलिसांच्या ताब्यात आले नसल्यामुळे, अनेक गोष्टी आणि त्यासंबंधीत शोध प्रलंबित राहिले होते. ज्याचा आता लवकरच उलगडा होईल अशी आशा आहे.



निलेश चव्हाणच्या घरात कोणकोणत्या गोष्टी सापडल्या?


अनेक दिवस फरार असलेला वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाणला अखेर पुणे पोलिसांनी नेपाळमधून शुक्रवारी अटक केली. त्यानंतर, आता निलेश चव्हाण याच्या कर्वेनगरमधील घराची झडती देखील पोलीसांकडून घेतली जात आहे. निलेश चव्हाणकडे असलेले हगवणे कुटुंबियांचे मोबाईल फोन जप्त करण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांकडून त्याच्या घराची झडती घेण्यात आली. या झडतीमध्ये निलेशच्या घरातून शशांक, लता आणि करिश्मा हगवणेचे मोबाईल जप्त करण्यात आले. तर निलेशचा एक लॅपटॉपही पोलिसांच्या हाती लागला आहे. तसेच निलेशचा पासपोर्ट आणि पिस्तुलीचा परवानाही पोलिसानी जप्त केला आहे. या लॅपटॉपमध्ये त्याचे अनेक व्हिडीओ लपवल्याचा संशय पोलिसांना आहे.



कोण आहे निलेश चव्हाण?


निलेश चव्हाण हा वैष्णवीची नणंद करिष्मा हगवणे हिचा मित्र आहे, वैष्णवीचं बाळ निलेश चव्हाणकडे होतं, हे बाळ आणण्यासाठी गेलेल्या कस्पटे कुटुंबाला बंदूक दाखवून धमकावल्याचा त्याच्यावर आरोप आहे, तसेच वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झाला होता.



नेपाळ बॉर्डरवर कसा पोहोचला निलेश चव्हाण?


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तो आधी पुण्याहून रायगडला पोहोचला, तेथून बायरोड त्याने दिल्ली गाठली. दिल्लीहून तो गोरखपूर उत्तर प्रदेशमध्ये पोहोचला. तेथून त्याने भारताची बॉर्डर क्रॉस केली आणि नेपाळला पोहोचला. तीने ते चार दिवस तो नेपाळ आणि भारत बॉर्डर भागातच होता. त्यानंतर तो भाताच्या हद्दीमध्ये येताच पोलिसांनी त्याला अटक केलं.

Comments
Add Comment

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

भूकंपानंतर आता रशियात ज्वालामुखीचा उद्रेक! राखेचे लोट ६,००० मीटर उंचीपर्यंत

मॉस्को: रशियाच्या कामचटका प्रांतातील Petropavlovsk येथे ८.८ तिव्रतेचा भीषण भूकंप झाल्यानंतर आता याच ठिकाणी ज्वालामुखीचा

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

शिंदेंनी शिवसेना का सोडली ? मुख्यमंत्र्यांनी केला खुलासा

मुंबई : विधान परिषदेच्या २०२२ च्या निवडणुकीनंतर शिवसेनेत दोन गट झाले. हे असे का झाले एकनाथ शिंदे पक्ष नेत्यांशी न

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, लवकरच होणार लागू

केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे. आठव्या वेतन आयोगाच्या अध्यक्ष आणि

Nitesh Rane: बेताल वक्तव्य करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांवर नितेश राणे संतापले, काय म्हणाले वाचा...

सिंधूदुर्ग:  सनातन धर्माने भारताचं वाटोळं केल्याचं बेताल वक्तव्य करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे