Thursday, January 15, 2026

आयरे गावात अनधिकृत बांधकामावर केडीएमसीची कारवाई

आयरे गावात अनधिकृत बांधकामावर केडीएमसीची कारवाई

कल्याण :कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ग प्रभाग अंतर्गत, आयरे गावात गटार व नाल्याच्या साफसफाईसंदर्भात प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी निरीक्षण व पाहणी केली. यादरम्यान संबंधित परिसरात अनधिकृत चाळीचे बांधकाम आढळून आले.पाहणीवेळी महापालिकेच्या ग प्रभागाच्या पथकास १५ जोत्यांचे (फाउंडेशन) बांधकाम व ५ पूर्ण झालेल्या खोल्यांचे अनधिकृत बांधकाम निदर्शनास आले.

सदर बांधकाम सार्वजनिक गटार व नाल्यावर अतिक्रमण करून करण्यात आले होते, त्यामुळे महापालिकेच्या ग प्रभागाच्या अतिक्रमण विरोधी पथकाद्वारे त्वरित निष्कासन कारवाई करून हे अनधिकृत बांधकाम पाडून टाकण्यात आले आणि परिसरात स्वच्छता व मोकळेपणा राखण्यात आलेला आहे. महापालिकेने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम वा अतिक्रमण सहन केले जाणार नाही आणि याविरोधात सातत्याने कठोर पावले उचलली जातील.

Comments
Add Comment