आदिवासी समुदायांना सामूहिक वन हक्काच्या जमिनी मिळण्यासाठी प्रयत्नांची गरज : चैत्राम पवार

नाशिक :आदिवासी समुदायांना सामुहिक वन हक्काच्या जमिनी मिळण्यासाठी प्रयत्नांची गरज असुन "जल, जंगल, जमीन, जन, आणि जनावर" या पंचसूत्रीच्या वापराने आदिवासी समुदायाचा शाश्वत विकास शक्य असल्याचे प्रतिपादन पद्मश्री श्री चैत्राम पवार यांनी केले आहे.ते एन.जी.ओ. फोरम नाशिक च्या वतीने आयोजित सत्कार समारंभा प्रसंगी बोलत होते. सामाजिक कार्यकर्ते श्री चैत्राम पवार रा.बारी पाडा ता.साक्री जि.धुळे यांना आदिवासी भागात "जल, जंगल, जमीन, जन, आणि जनावर" या पंचसूत्री वर आधारित कार्यक्रम यशस्वीरित्या राबवून आदिवासी समाजाचा विकास घडवून आणल्याबद्दल भारत सरकार ने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला.त्यांना हा सन्मान मिळाल्याबद्दल एन.जी.ओ.फोरम नाशिक च्या वतीने अध्यक्ष श्री.मुक्तेश्वर मुनशेट्टीवार व सचिव राजाभाऊ शिरसाठ यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.हा सत्कार समारंभ हुतात्मा स्मारक,नाशिक येथे पार पडला.


सोबतच विविध क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटविणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार श्री चैत्राम पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यात प्रामुख्याने श्रावण देवरे-आदिवासी सेवक पुरस्कार,निशिकांत पगारे- भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड,शोभा काळे - विधवा व दिव्यांगांचे पुनर्वसन,महेंद्र मुळे -एच.आय. व्ही बाधितांचे पुनर्वसन, यशवंत लकडे - बेघर- निराश्रितांसाठी मोफत निवारा, रामदास नागवंशी - पत्रकारिता यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमा प्रसंगी निशिकांत पगारे, अरविंद क्षीरसागर, भगवान भगत, डॉ.प्रभाकर वडजे, नितीन सोनवणे, संपादक रामदास नागवंशी, महेंद्र मुळे, श्रावण देवरे, शोभा काळे, योगेश बर्वे,यशवंत लकडे आदी नाशिक जिल्ह्यातील सामाजिक संस्था चे पदाधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण का पाहिजे?

या प्रश्नाचे खरे उत्तर देण्याची छगन भुजबळ यांची मराठा समाजाच्या सुशिक्षित नेत्यांकडे मागणी नाशिक : मराठा

नाशिक इंडस्ट्रियलची डेस्टिनेशनकडे वाटचाल

सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूट टेस्टिंग लॅब ही ऊर्जा मीटर्स ट्रान्सफार्मसी ऑइल इन्सुलेशन प्रयोग शाळा, केबल,

पाहुणे आले आणि दागिने चोरून पसार झाले

नाशिक : घरात मुक्कामासाठी आलेल्या पाहुण्यांनी रात्रीच्या सुमारास घरातील १८ हजार रुपये किमतीचे दागिने चोरून

अंत्ययात्रेची तयारी झाली पण खोकल्याने वाचला तरुणाचा जीव!

नाशिक : अपघातामध्ये जखमी झालेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तरुण मृत झाल्याचा माहितीवरून परिवाराने

नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकुळ

त्र्यंबकेश्वर : नाशिक जिल्ह्यात पंधरा दिवसात विविध ठिकाणी तीन बिबट्यांना पकडण्यात वन विभागाला यश आले. जिल्ह्यात

कांदा खरेदी करूनही नाफेड' , एनसीसीएफने थकविले बळीराजाचे पैसे

नाशिक : राज्यामध्ये केंद्र सरकारच्या नाफेड आणि एनसीसीएफ या दोन संस्थांनी शेतकऱ्यांच्या कांदा खरेदी करून देखील