सोलापूर, मडगाव येथून अष्ट ज्योतिर्लिंग श्रावण विशेष यात्रा

  55

आयआरसीटीसीच्या भारत गौरव पर्यटक ट्रेनद्वारे करा प्रवास


मुंबई : इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड ही भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत 'नवरत्न' म्हणून सूचीबद्ध कंपनी आहे. आयआरसीटीसी ऑनलाइन रेल्वे तिकीट बुकिंग, केटरिंग, पर्यटन, रेल नीर आणि हॉस्पिटॅलिटी सेवांसह विविध सेवा देते. आयआरसीटीसीचे उद्दिष्ट संपूर्ण भारतभर प्रवास अधिक सोयीस्कर, आनंददायी आणि परवडणारा बनवणे आहे.


आयआरसीटीसीच्या पश्चिम विभाग मुंबई कार्यालयाने १९ जुलै २०२५ रोजी सोलापूरहून आणि ०५ ऑगस्ट २०२५ रोजी मडगाव येथून भारत गौरव पर्यटक ट्रेनद्वारे ‘अष्ट ज्योतिर्लिंग श्रावण विशेष यात्रा’ सुरू करण्याची घोषणा केली आहे. आयआरसीटीसीच्या भारत गौरव टूर पॅकेजेस द्वारे या श्रावणात प्रवाशांना संस्मरणीय सुट्टीचा अनुभव घेता येईल. पश्चिम विभागाचे ग्रुप जनरल मॅनेजर गौरव झा म्हणाले की, हे पॅकेज सर्वांना भारतातील प्रमुख ज्योतिर्लिंग व इतर लोकप्रिय पर्यटन स्थळांना भेट देण्याचा एक अनुकूल आणि सोयीस्कर मार्ग प्रदान करते,जे खिशाला परवडणारे तर आहेच पण त्याच बरोबर आरामदायी रेल्वे प्रवासयाची सुद्धा हामी देते. १९ जुलै २०२५ रोजी सोलापूरहून सुरु होणाऱ्या टूर पाककजे ची किंमत प्रति व्यक्ती २२८२०/- रुपये आणि ०५ ऑगस्ट २०२५ रोजी मडगावहून सुरु होणाऱ्या टूर पाककजे ची किंमत प्रति व्यक्ती अंदाजे २३८८०/- रुपये पासून सुरू होते.



गौरव झा म्हणाले की, आमचे ध्येय प्रवास अधिक सुलभ आणि आनंददायी बनवणे आहे, जेणेकरून प्रत्येक ट्रिप संस्मरणीय होईल. हे पॅकेज सुविधा, आराम आणि खिशाला परवडणारे असावे ह्या उद्देश्याने डिझाईन केले आहे, ज्यामुळे प्रवाश्यांना श्रावणात भारतातील उत्कृष्ट आणि लोकप्रिय स्थळांना एक्सप्लोर करण्याची संधी मिळते. या पॅकेजेससाठी पर्यटकांमध्ये बरीच उत्सुकता निर्माण झाली आहे. पॅकेज ऑनलाईन होताच आयआरसीटीसीचे नियमित ग्राहक, आयआरसीटीसीच्या www.irctctourism.com या संकेत स्थळावरून ऑनलाइन बुकिंग करू शकतात.


भारत गौरव गाड्यांमध्ये स्लीपर (नॉन-एसी), एसी थ्री टियर आणि एसी टू टियर कोचचे मिश्रण असते. या गाड्यांच्या बाहेरील भागात लोकप्रिय भारतीय स्मारके, शिल्पे, खुणा आणि नृत्य प्रकार इत्यादींचे प्रदर्शन केले जाते. गाडीची एकूण क्षमता सुमारे ६००-७०० प्रवासी घेऊन जाण्याची आहे. गाडी मध्ये पब्लिक अनाऊनसमेंट, सीसीटीव्ही कॅमेरे आणि ताजे जेवण तयार करण्यासाठी सुसज्ज पेंट्री कार बसवण्यात आली आहे.


आयआरसीटीसीने हे ऑल इन्कलुसिव्ह पॅकेज अतिशय चांगल्या रित्या डिझाइन केले असून, त्यामध्ये कन्फर्म रेल्वे तिकिटासह राहण्याची सोय, राहण्याची सोय, पर्यटनाच्या ठिकाणी बसेस ने फिरण्याची सोय, ऑन-बोर्ड आणि ऑफ-बोर्ड जेवण, टूर गाईड, प्रवास विमा असे सगळे समाविष्ट केले आहे. आयआरसीटीसी चे उपलब्ध पॅकेजेस, त्यांचा तपशील, किंमत आणि बुकिंग प्रक्रियांबद्दल अधिक माहितीसाठी ग्राहक अधिकृत आयआरसीटीसी वेबसाइट www.irctctourism.com ला भेट देऊ शकतात.

Comments
Add Comment

हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन

प्रतिष्ठित लता मंगेशकर पुरस्कारांसह ६० आणि ६१ वे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येणार मुंबई :

Monsoon Disease: मुंबईकरांनो सावधान! शहरात ‘या’ ३ रोगांचा कहर

मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनियाचे रुग्णसंख्या वाढल्याने महानगरपालिका सतर्क मुंबई:  शहरात गेली अनेक

मिठीचा गाळ, गोतास काळ; ७,००० पानांचे आरोपपत्र, मोठे मासे सापडणार!

मुंबई पोलिसांकडून मिठी नदी गाळ काढणी घोटाळा उघड ६५.५४ कोटींचा धक्कादायक प्रकार! मुंबई : ६५.५४ कोटींच्या मिठी

सांगा चूक कोणाची? लपवाछपवी कोणासाठी? बीएमसी आणि म्हाडामध्ये घमासान!

मुंबई : मुंबई महानगरपालिका (BMC) आणि महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (MHADA) यांच्यात चांदिवलीतील

वसई विरार मनपाच्या माजी आयुक्तांनंतर आणखी एका बड्या अधिकाऱ्यावर ED ची धाड

मुंबई : वसई विरारचे महापालिकेचे महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार यांच्यावर ED नं काही दिवसांपूर्वीच धाड टाकली

हल्लेखोराला पकडण्यासाठी पोलिसांनी बनवले फेक इन्स्टाग्राम अकाउंट

मुंबई : मुंबईतील धारावी परिसरात एप्रिल महिन्यात एका वीस वर्षीय तरुणाने एका व्यक्तीला धारदार हत्याराने वार करत