यंत्रणांनी १०० टक्के निधी खर्च करण्यासाठी काम करावे

नियोजन समितीच्या बैठकीत आशीष शेलारांच्या सूचना


मुंबई : जिल्हा नियोजन समिती ही एक महत्त्वाची समिती असून या समितीच्या बैठकीमध्ये उपस्थित करण्यात आलेले प्रश्न हे जनतेच्या हिताचे असतात. तसेच शासनाचा निधी जनतेच्या कल्याणासाठी खर्च करण्याची जबाबदारी कार्यान्वयीन यंत्रणांवर असते. त्यामुळे सर्व विभाग प्रमुखांनी १०० टक्के निधी खर्च करण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच लोकप्रतिनिधींनी या बैठकीमध्ये मांडलेले प्रश्न सोडवण्यासाठी सर्वच अधिकारी वर्गाने प्रयत्न करावेत, अशा सूचना सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिल्या.


वांद्रे येथील चेतना महाविद्यालयामध्ये मुंबई उपनगर जिल्ह्याची जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न झाली. त्यावेळी मंत्री शेलार यांनी या सूचना दिल्या. या बैठकीस खासदार वर्षा गायकवाड, खासदार रवींद्र वायकर, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्यासह मुंबई उपनगर जिल्ह्यातील आमदार, लोकप्रतिनिधी आणि निमंत्रित सदस्य उपस्थित होते.



जिल्ह्यातील जुन्या मोडकळीस आलेल्या तसेच धोकादायक इमारतींचा पुनर्विकास करणे सोपे व्हावे, या हेतूने शासनाने अशा इमारतीतील रहिवाशांना २० हजार रुपये भाडे देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला असल्याचेही मंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले.


ज्या भागात दरडी कोसळण्याचा धोका आहे अशा भागात मॅस नेट बसवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगून मंत्री शेलार म्हणाले की, नऊ मीटर पेक्षा कमी उंचीची भिंत असणाऱ्या ठिकाणी म्हाडा मॅस नेट बसवणार आहे. तर नऊ मीटर पेक्षा जास्त उंचीच्या ठिकाणी मॅस नेट बसवण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येणार आहे. बैठकीमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या १ हजार ८८ कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. तसेच कलिना येथील फोर्स वन प्रशिक्षण केंद्रासही मान्यता देण्यात येत असल्याचे समितीचे अध्यक्ष मंत्री शेलार यांनी सांगितले. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे वनक्षेत्र घोषित झाल्यानंतर अतिरिक्त वन क्षेत्र नव्याने घोषित केलेल्या केतकी पाढा आणि परिसरात असलेल्या ८० हजार लोकवस्ती आजही प्राथमिक सेवा सुविधांपासून वंचित असून त्यांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन व्हावे, म्हणून हा भाग संरक्षित जंगल मधून वगळण्यात यावा, असा ठराव आमदार प्रविण दरेकर यांनी मांडला. त्याला एकमताने मंजुरी
देण्यात आली आहे.

Comments
Add Comment

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.

नारळासाठी ४५ रुपयांची फोडणी; आवक घटल्याने मुंबईकरांना भुर्दंड

मुंबई : सण, उत्सव कालावधीत नारळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुंबईकरांना सध्या या नारळासाठी ४५ ते ५० रुपये मोजावे

नरिमन पॉइंट ते वसईपर्यंत १० मार्गांवर होणार जलवाहतूक

मुंबई : महामुंबईत १० मार्गांवर जलवाहतूक सुरू होणार आहे. याद्वारे नव्या विमानतळाला चार मार्ग जोडले जाणार आहेत.

काय चाललंय काय ? एका महिन्यात तीन वेळा बंद पडली मोनोरेल

मुंबई : मध्य मुंबई आणि पूर्वेकडील उपनगरे यांना जोडणारी मोनोरेल ही वेगाने आरामदायी प्रवास करण्यासाठी सुरू

महाराष्ट्राच्या नव्या राज्यपालांनी 'या' भाषेत घेतली शपथ

मुंबई : आचार्य देवव्रत यांनी सोमवारी १५ सप्टेंबर रोजी सकाळी राजभवनात झालेल्या सोहळ्यात राज्यपालपदाची शपथ