नाशिक जिल्ह्यातील ५६ हजार शेतकरी जाणार संपावर : बोराडे

  20

पिंपळगाव: संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा लढा उभारण्यासाठी नाशिक येथे भव्य कर्जमुक्ती मेळावा रविवारी (ता 1जून) दूपारी एक वाजता अनंत कान्हेरे मैदाना शेजारी कर्जमुक्ती आंदोलन स्थळावर होणार असल्याची माहिती समिती अध्यक्ष भगवान बोराडे यांनी दिली आहे. नाशिक जिल्हा बँकेच्या जमिनी जप्तीच्या आणि लिलावाच्या विरोधात १ जून २०२३ पासून सिव्हिल हॉस्पिटल च्या समोर दोन वर्षापासून धरणे आंदोलन सुरू आहे.


या धरणे आंदोलनाला आता १ जून २०२५ ला दोन वर्षे पूर्ण होत आहे. त्या निमित्त येत्या १ जून २०२५ रोजी शेतकऱ्यांचा कर्जमुक्ती मेळावा नाशिक येथे अनंत कन्हेरे मैदान येथे घेण्यात आला आहे. या कर्जमुक्ती मेळाव्यासाठी प्रमुख अतिथी छत्रपती संभाजी राजे भोसले , आणि अर्थतज्ञ विजय जावंदिया हे असणार आहे तसेच प्रमुख उपस्थिती वारकरी सांप्रदायाचे आचार्य रामकृष्ण दासजी महाराज लहवितकर नाशिक, सामाजिक व राजकीय संघर्ष करणारे शांतिगिरी महाराज नाशिक शेतकऱ्यांचे संघर्ष योद्धे अनिल गोटे ज्येष्ठ साहित्यिक धनंजय पाटील काकडे अमरावती शेतकरी झुंजार नेते माननीय श्री लक्ष्मण वडले जालना शरद जोशी विचार मंचाचे अध्यक्ष माननीय श्री विठ्ठल राजे पवार सीता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रकांत ऊर्फ बाळासाहेब देशमुख, यवतमाळ, हे महाराष्ट्रातील अग्रगण्य शेतकरी नेते आणि सांप्रदायातील महंत उपस्थित राहणार आहे. तरी या कार्यक्रमाला बहुसंख्येने सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन कर्जमुक्ती आंदोलनाचे सेनापती भगवान बोराडे, आदिवासी नेते कैलास बोरसे, समन्वय समिती सदस्य श्री दिलीप पाटील , शेतकरी नेते सुधाकर मोगल निफाड, शेतकरी नेते नानासाहेब बच्छाव आयोजक संघटना शेतकरी संघटना समन्वय समिती, आदिवासी संघर्ष समिती, व नाशिक जिल्हा नागरिक कृती समितीच्या वतीने आयोजकांनी
केले आहे.

Comments
Add Comment

ना. भुजबळांकडून लासलगावी पुलाच्या कामाची पाहणी

मुख्य बाजारपेठेतील पुलाचे काम दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश लासलगाव : लासलगाव पाटोदा रस्त्यावरील

गंगापूर धरणातून विसर्ग वाढला ; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

नाशिक : नाशिक जिल्ह्यात गेले चार पाच दिवसात पावसाची संततधार कायम असल्याने , जिल्ह्यातील प्रमुख धरणांचा पाणीसाठा

कांदासाठा घोटाळ्यावर हायकोर्टाची तत्काळ कार्यवाही

विश्वासराव मोरे यांच्या याचिकेला ऐतिहासिक यश पिंपळगाव : गेल्या दहा वर्षांमध्ये देशभरातील शेतकऱ्यांच्या

बडगुजर यांचा प्रवेश; काही पेच, काही संदेश

नाशिक बीट‌्स : प्रताप म. जाधव उबाठातून भाजपात स्वागत करण्यात आलेल्या सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाच्या

आता शिवसेनाप्रमुखांना अनुभवताही येणार!

गंगापूर रोडवरील स्मृती उद्यानात साकारणार ‘थ्रीडी होलोग्राम’ नाशिक : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या

बेकायदेशीर निविदा प्रक्रिया राबवून एक कोटींचा अपहार; कार्यकारी अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल

नाशिक : खोटे दस्तऐवज तयार करून निविदा तयार करून बेकायदेशीरपणे निविदा प्रक्रिया राबवून शासनाच्या एक कोटी