पश्चिम रेल्वेवर ३६ तासांचा ब्लॉक, १६२ लोकल रद्द

  48

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावर आजपासून म्हणजेच शनिवार ३१ मे २०२५ रोजी दुपारी एक वाजल्यापासून सोमवार २ जून रोजी मध्यरात्री एक वाजेपर्यंत असा ३६ तासांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक आहे. कांदिवली ते बोरिवलीदरम्यान सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी पाचव्या आणि यार्ड मार्गिकेवर ब्लॉक घेण्यात आला आहे. यावेळी कांदिवली पश्चिमेलगतचे उन्नत तिकीट आरक्षण केंद्र पाडण्यात येणार आहे. पर्यायी सात खिडक्यांचे नवे केंद्र खुले करण्यात आले आहे.

ब्लॉक असल्यामुळे शनिवारी दुपारनंतर ७३ आणि रविवारी दिवसभरात ८९ अशा एकूण १६२ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. दोन दिवस काही लोकल फेऱ्या विलंबाने धावतील. विशेष ब्लॉक असल्यामुळे ३१ मे रोजी धावणारी गाडी क्र.१९४१८ अहमदाबाद-बोरिवली एक्स्प्रेस वसई रोडपर्यंतच चालवण्यात येईल. १ जून रोजी (१९४१७) बोरिवली-अहमदाबाद एक्स्प्रेस वसईहूनच रवाना होईल. ३१ मे आणि १ जून रोजी (१९४२५) बोरिवली-नंदुरबार भाईंदर स्थानकावरून धावेल. ३१ मे रोजीची (१९४२६) नंदूरबार-बोरिवली वसई रोडपर्यंतच चालवण्यात येईल. एकूण चार एक्स्प्रेस फेऱ्यांवर परिणाम होणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते विद्याविहार आणि 'सीएसएमटी' ते चुनाभट्टी/वांद्रेदरम्यान मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. या वेळेत रेल्वे रुळांसह सिग्नलची देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून, काही विलंबाने धावणार आहेत.

मध्य रेल्वे
सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान जाणाऱ्या आणि येणाऱ्या धीम्या मार्गावर ब्लॉक
रविवार १ जून २०२५ रोजी सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ पर्यंत ब्लॉक
ब्लॉक काळात जाणाऱ्या आणि येणाऱ्या धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या जलद मार्गावर वळवण्यात येतील. लोकल फेऱ्या घाटकोपरवरून पुन्हा जाणाऱ्या आणि येणाऱ्या धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. काही लोकल फेऱ्या रद्द, तर काही २० मिनिटे विलंबाने धावतील.

हार्बर रेल्वे
सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे जाणाऱ्या आणि येणाऱ्या मार्गावर ब्लॉक
रविवार १ जून २०२५ रोजी सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० पर्यंत ब्लॉक
सीएसएमटी/वडाळा ते वाशी/बेलापूर/पनवेलदरम्यान धावणाऱ्या जाणाऱ्या आणि येणाऱ्या लोकल रद्द. हार्बरवरील प्रवाशांसाठी पनवेल ते कुर्ला दरम्यान विशेष फेऱ्या चालवण्यात येतील.
Comments
Add Comment

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही

गणेशोत्सवासाठी रात्रभर रस्त्यावर धावणार बेस्टच्या बस

दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय टळणार मुंबई : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी साकारलेले देखावे

विवाह नोंदणीसाठी आता रविवारीही महापालिकेची सेवा

जोडप्यांना सुट्टीच्या दिवशीही करता येणार नोंदणी विवाह मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईत दरवर्षी

Mumbai Goa Highwayवरील कशेडी बोगद्याजवळ मोठी दुर्घटना, कोकणात जाणाऱ्या खासगी बसला आग

मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची गर्दी आता सुरू झाली आहे. याच दरम्यान, मुंबई गोवा हायवेवर मोठी दुर्घटना

बेस्ट पाठोपाठ मुंबई महापालिका बँकेच्या निवडणुकीत उबाठाच्या जय सहकारचा धुव्वा

युवा सेनेच्या प्रदीप सावंत यांच्यासह अनेकांचा पराभव मुंबई : बेस्ट पाठोपाठ दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या

गणेशोत्सवासाठी रात्रभर रस्त्यावर धावणार बेस्ट बसेस

दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी सुविधा मुंबई : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी