बकरी ईदसाठी अनधिकृत कत्तल रोखणार

महापालिकेची तीन भरारी पथके तैनात


मुंबई (खास प्रतिनिधी): बकरी ईद सणाच्या निमित्ताने धार्मिक पशुवधाच्या परवानगीसाठी अर्ज करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने यंदा माय बीएसी अॅप्लिकेशनवर ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच धार्मिक पशुवधासाठी म्हैसवर्गीय प्राणी व बकरे आयात परवाना तसेच ‘स्लॉट बुकिंग’साठी https://www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे बकऱ्यांचा अधिकृत वध करण्यासाठी देवनार पशुवधगृहाची सुविधा असूनही अनेक मुस्लिम बांधवांकडून अनधिकृतपणे कत्तल केली जाते. त्यामुळे अशाप्रकारे होणाऱ्या बकऱ्यांच्या कत्तलींचा शोध घेण्यासाठी महापालिकेच्यावतीने शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरांसाठी स्वतंत्र भरारी पथके तयार करण्यात आली आहे.



महानगरपालिकेच्या बाजार विभागामार्फत दिनांक ७ ते ९ जून २०२५ दरम्यान मुंबईत एकूण १०९ ठिकाणी धार्मिक पशुवधासाठी परवानगी देण्यात आली आहे. ऑनलाईन परवानगीसाठी अर्ज करताना संबंधित जागा सहकारी गृहनिर्माण संस्था किंवा खासगी मालकीची असल्यास त्यासंबंधीत ‘ना हरकत प्रमाणपत्र’ तसेच अर्जदाराचे ओळखपत्र अर्ज करताना अपलोड करावे लागेल. किती पशुंचे आणि कोणत्या दिवशी धार्मिक पशुवध करावयाचे आहे, याचा उल्लेख अर्ज करताना करावा लागेल.


महापालिकेच्यावतीने सर्व प्रकारची व्यवस्था आणि सुविधा देवनार पशुवधगृहांमध्ये उपलब्ध करून दिल्यानंतरही अनधिकृतपणे बकऱ्यांची बळी दिला जात आहे. महापालिकेने यासाठीची दिलेल्या सुविधेमध्ये बकऱ्यांची आरोग्य चाचणी करून ते कापण्यास परवानगी दिली जाते. तर अनधिकृतपणे बकरे कापताना त्याची आरोग्यदृष्टी कोनातून चाचणी होत नाही. त्यामुळे रोगी बकरा कापला जावून त्याच्या कत्तलीमध्ये आसपासच्या परिसरात दुर्गंध आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण होवू शकतो. त्यामुळे अशाप्रकारच्या अनधिकृत कत्तलीसाठी महापालिकेच्या बाजार विभागाच्यावतीने शहर, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरांसाठी २४ तास तपासणी करण्यासाठी भरारी पथक स्थापन करण्यात आले. या पथकाकडे तक्रारी आल्यानंतर धाडी घालून त्यांच्याकडे वध करण्यासाठीची परवानगी आहे का याची तपासणी केली जाईल. तसेच जर नसेल तर बकरे जप्त केले जातील आणि तसेच त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद असल्याचे बाजार विभागाच्यावतीने सांगण्यात येत आहे.

Comments
Add Comment

नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण व करिअरची संधी

वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती महाराष्ट्र-बाडेन वुटेमबर्ग राज्यांदरम्यान संयुक्त

राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय; जमीन मोजणीच्या शुल्कात मोठी कपात

मुंबई : राज्य सरकारने महसूल प्रशासन अधिक सशक्त करण्यासाठी अनेक बदल राबवले असून, आता शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा

'जिजामाता नगरवासियांच्या पुनर्वसनाचा विषय नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मांडणार'

मुंबई :  मागील तीस वर्षांपासून काळाचौकी येथील जिजामाता नगरवासियांचे पुनर्वसन विकासकाच्या आडमुठेपणाच्या

चेंबूरमध्ये शिक्षणासाठी पाच किलोमीटर पायपीट

मराठी शाळेअभावी विद्यार्थ्यांचे हाल मुंबई : चेंबूर येथील वाशीनाका परिसरात पालिकेच्या मराठी माध्यमाची

मुंबईतील अनधिकृत झोपड्यांवर ‘नेत्रम’ची नजर

बांधकामाचे फोटो, बांधकाम करणाऱ्या व्यक्तीचे नाव अॅपवर समजणार मुंबई : मुंबईतील अनधिकृत झोपड्यांच्या समस्येवर

राज्यातील शेतकऱ्यांना ३० जूनपर्यंत कर्जमाफी!

परदेशी कमिटीचा अंतिम अहवाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जमा होणार मुंबई : कर्जमाफीबाबत राज्यातील