पाकिस्तानातील दहशतवादाच्या मुद्द्यावर जागतिक नेत्यांचा भारताला पाठिंबा

  43

नवी दिल्ली : पाकिस्तानातील दहशतवादाच्या मुद्द्यावर रियाध, जाकार्ता, सौदी अरेबिया, इटली, इंडोनेशिया या सर्व देशांनी भारताला पाठिंबा जाहीर केला आहे.


पाकिस्तानस्थित दहशतवादाविरोधात आपण भारताबरोबर असल्याचे सौदी अरेबियाने स्पष्ट केले.इटलीने द्विपक्षीय सहकार्य देऊ केले तर भारताला दहशतवादाविरोधातील शक्य त्या सर्व व्यासपीठांवर आपला पाठिंबा असल्याचे इंडोनेशियाने सांगितले.तर दहशतवादाविरोधात 'शून्य सहिष्णूते'ची भूमिका घेण्याच्या भारताच्या धोरणाची दक्षिण आफ्रिकेने प्रशंसा केली. फ्रान्सनेही या मुद्द्यावर आपण भारताबरोबर असल्याचे स्पष्टपणे सांगितले.


पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आपल्या जनतेचे दहशतवादाविरोधात संरक्षण करण्याच्या भारताच्या अधिकाराला विविध देशांनी पाठिंबा दिला आहे असे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी सांगितले.


'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान-पुरस्कृत दहशतवादाच्या मुद्द्यावर भारताची भूमिका जागतिक पातळीवर मांडण्यासाठी सात सर्वपक्षीय शिष्टमंडळे विविध देशांचा दौरा करत आहेत. पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये २२ एप्रिलला केलेल्या हल्ल्यानंतर भारताने कोणत्या परिस्थितीत ऑपरेशन सिंदूरअंतर्गत पाकिस्तानवर कारवाई केली हे जागतिक नेत्यांना पटवून देण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला आहे.


त्याअंतर्गत ३३ देशांच्या राजधान्यांनाही भेट दिली जात आहे. सौदी अरेबिया, ग्रीस, दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, फ्रान्स, पनामा या देशांमधील भारतीय दूतावासाने विविध भेटींची एक्सवरून माहिती दिली.

Comments
Add Comment

हैदराबादमध्ये क्रौर्याचा कळस! पतीने गर्भवती पत्नीची हत्या करून मृतदेहाचे केले तुकडे

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका अत्यंत धक्कादायक घटनेने सगळ्यांनाच हादरवून सोडले आहे. एका पतीने

गंभीर गुन्ह्याप्रकरणी तुरुंगात गेल्यास पीएम सीएमना हटवणाऱ्या विधेयकाप्रकरणी विरोधकांचा रडीचा डाव

नवी दिल्ली : गंभीर गुन्ह्याप्रकरणी किमान ३० दिवस तुरुंगात घालवले किंवा तशी कोठडी देण्यात आली तर संबंधित मंत्री

रस्ते अपघातामध्ये प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये दुर्घटना कैद

जम्मू आणि काश्मीर: रस्ते अपघातामध्ये भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताचं

गगनयान मोहिमेसाठीची इस्रोची एअर ड्रॉप चाचणी यशस्वी

नवी दिल्ली : गगनयान मोहिमेसाठी इस्रोने यशस्वी एअर ड्रॉप चाचणी घेतली. ही पहिली एअर ड्रॉप चाचणी होती, जी पूर्ण

भारताच्या स्वदेशी हवाई संरक्षण यंत्रणांची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओने भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणेसाठी शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी यशस्वी चाचण्या

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात २१ वर्षीय विद्यार्थीनी जखमी

लखनऊ : भटक्या कुत्र्यांचा हल्ला सध्या चर्चेत असून भटक्या कुत्र्यांच्या जीवघेण्या हल्ल्याच्या बातम्या अजूनही