कोलाडमधील नागरिकांची मिटणार पाण्याची चिंता

२८ धरणातील जलसाठ्यात ११ टक्क्यांनी वाढ


अलिबाग: रायगड जिल्ह्यातील कोलाड पाटबंधारे विभागाच्या २८ धरणांत २१ मे रोजी २७ टक्केच जलसाठा शिल्लक होता. सात धरणात दहा टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक होता; मात्र त्यानंतर चार-पाच दिवस सलग पडलेल्या पावसाने त्यांच्या जलसाठ्यात ११ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सुतारवाडी धरण शंभर टक्के भरले असून, त्याखालोखाल पाभरे धरण भरले आहे. धरणांमधील वाढलेल्या पाणीसाठ्यामुळे नागरिकांची पाण्याची चिंता मिटणार आहे.


रायगड जिल्ह्यात मुरुड, तळा, रोहा, पेण, उरण आणि अलिबाग तालुक्य़ात प्रत्येकी एक, सुधागड तालुक्यात पाच, श्रीवर्धन तालुक्यात तीन, म्हसळा तालुक्यात दोन, महाड तालुक्यात चार, कर्जत तालुक्यात, खालापूर तालुक्यात तीन, पनवेल तालुक्यात तीन, या १३ तालुक्यांत २८ धरणे आहेत. यामधून जिल्ह्यातील, तसेच नवी मुंबईतील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येतो. या सर्व धरणात ६८.२६१ दलघमी पाण्याच्या साठ्याची क्षमता असून, मे महिन्यापर्यंत जलसाठा कमी होत जातो. मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात २८ धरणात यावेळी २७ टक्केच जलसाठा शिल्लक राहिला होता. त्यामुळे मे महिना संपेपर्यंत पाण्याचे संकट गडद होण्याची शक्यता होती; मात्र २५ मेपासून सुरू झालेल्या पावसाने जलसाठा वाढण्यास मदत मिळाल्याने पाण्याची चिंता मिटण्याची शक्यता आहे.सात दिवसात सरासरी ५०४ मिमी पाऊस पडला.


रायगड जिल्ह्यात २२ मेपासून धुवाँधार पाऊस पडल्याने आतापर्यंत सरासरी ५०४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सर्वाधिक २२१ मिमी पावसाची नोंद मुरुड तालुक्यात झाली, तर सर्वात कमी १९२ मिमी नोंद माणगावमध्ये झाली आहे. आठवडाभर पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले, तर रस्ते खचले आहेत. बुधवारी सकाळी पावसाने उघडीप दिल्यानंतर अर्धवट तुटलेली झाडे तोडण्याचे काम ठिकठिकाणी सुरू होते. काही ठिकाणी अर्धवट तुटलेली घरे व्यवस्थित करण्याचे काम सुरू होते. रस्त्याच्या कडेला तुटलेली झाडे तोडण्याकरिता काही तासांसाठी वाहतूक बंद करण्यात आली होती. म्हसळा, मुरुड, श्रीवर्धन, माथेरान, रोहा या तालुक्यांमध्ये ५०० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. सलग पडणाऱ्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. तर जिल्ह्यात आजपर्यंत १३ कच्च्या आणि २६० पक्क्या घरांचे नुकसान झाले आहे.



आठवडाभरातील तालुकानिहाय पर्जन्यमान


आठवडाभरात मुरुड तालुक्यात तब्बल २९१ मिमी, तर म्हसळा तालुक्यात ७८३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्या खालोखाल श्रीवर्धन ७७०, तळा ६३९, पनवेल ६०५.५, रोहा ५०४, माथेरान ४०९, सुधागड ३७२, पेण ३६८, महाड ३२८, खालापूर २८६, उरण २५४, कर्जत २४२, माणगाव १९२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

Comments
Add Comment

Eknath Shinde : रायगड किल्ल्यावरून परतताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातग्रस्त बाईक स्वाराला दिला मदतीचा हात

विचारपूस करत ताफ्यातील रुग्णवाहिकेतून नजीकच्या रुग्णालयात केले दाखल रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५३

Eknath Shinde: रायगड किल्ल्यावरील पाण्याचे दुर्भिक्ष दूर करणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही; शिवछत्रपतींचा ३५३ वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा मुंबई :

Dam Water Levels : रायगड जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ

जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ नागरिकांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा अलिबाग : रायगड जिल्ह्यात मागील

RTI : माहिती अधिकार कायद्यात मोठे बदल; महाराष्ट्र शासनाचे नवे नियम लागू

रायगड : माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत अर्जदारांसाठी महाराष्ट्र शासनाने काही महत्त्वपूर्ण बदल लागू केले

Nitesh Rane : रायगड जिल्ह्यातील मच्छीमारांच्या समस्यांबाबत तातडीने कार्यवाही करा

मुंबई,  : रायगड जिल्ह्यातील आरसीएफ कंपनीच्या मरीन आउटफॉल लाईनमुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक

Ashish Shelar : रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी समन्वित कृती आराखडा तयार करून कामांना गती द्या

मुंबई,: रायगड किल्ल्याच्या संवर्धन व विकासासाठी राज्य शासनाकडून निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही.