किल्ले रायगड मार्गावरील कोंझर घाटरस्त्यावरील वाहतूक पूर्ववत

मात्र धोका कायम; प्रशासनाकडून नागरिकांना दिला सतर्कतेचा इशारा


महाड: हिंदवी स्वराज्याचे राजधानी किल्ले रायगडकडे जाणाऱ्या महामार्गावर कोंझर गावाच्या हद्दीत घाटरस्त्याचा काही भाग खचल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यामुळे सुमारे ५० हून अधिक गाववाड्यांचा तालुक्याशी संपर्क तुटला होता मात्र संबंधित ठेकेदारामार्फत प्रशासनाकडून युद्ध पातळीवर काम करून केवळ १२ तासांत हा मार्ग सुरु करण्यात आला आहे. मात्र पावसाचा जोर लक्षात घेता घाट रस्त्यावर कोसळणाऱ्या दरडी आणि ६ व ९ जून रोजी किल्ले रायगडावर येणाऱ्या शिवभक्तांची गर्दी लक्षात घेता धोका कायम असून प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


महाड ते किल्ले रायगडपर्यंतच्या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला असून मागील सुमारे दोन ते अडीच वर्षांपासून या महामार्गाचे काम अक्षय कन्स्ट्रक्शन्स या ठेकेदार कंपनीकडून सुरू आहे मात्र ठेकेदाराच्या मार्फत या मार्गाच्या निर्मितीसाठी होणारा विलंब व जाणीवपूर्वक केलेला निष्काळजीपणा नागरिकांच्या रोषाचे कारण ठरत आहे.


सोमवारी सकाळी कोंझर गावाच्या हद्दीत असलेल्या धबधब्या जवळ रस्ता खचल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. सुमारे २४ किमी च्या या महामार्गा दरम्यान अनेक मोऱ्यांची कामे अद्याप अर्धवट अवस्थेत असून काही दिवसांवर आलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी हजारोच्या संख्येने येणाऱ्या शिवभक्तांची गर्दी लक्षात घेता या मार्गावरून ये-जा करताना मोठी गैरसोय होऊन छोट्या मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. याचबरोबर किल्ले रायगड परिसरात पडणाऱ्या पावसाचा जोर पाहता घाट रस्त्यावर दरडी कोसळण्याची भितीही वर्तवली जात आहे. त्यामुळे या महामार्गावरून प्रवास करताना जनतेनी सतर्कता बाळगावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

'हायटेक केसपेपर नोंदणी' ठरतेय डोकेदुखी !

अलिबागच्या जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या लांब रांगा अलिबाग  : येथील जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये आयुष्मान

महाडमध्ये वृद्ध महिलेची हत्या; २४ तासांत गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश

महाड : महाड तालुक्यातील नाते येथे ७५ वर्षीय लीलावती राजाराम बलकवडे यांची शेतातील वाड्यावर हत्या करून सोन्याचे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पेण दौरा रद्द

अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यातील नगरपालिकांचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून, या प्रचाराकडे सर्वच

सांडपाण्यामुळे कुंडलिका नदीचे पाणी प्रदूषित

रोहा : रोहा परिसरातील जीवनरेखा मानली जाणाऱ्या कुंडलिका नदीत धाटाव एमआयडीसी परिसरातून सोडल्या जाणाऱ्या

रेवस - रेड्डी सागरी मार्गावरील आणखी एका पुलाच्या कामाला गती

नव्या रेवदंडा - साळाव पुलासाठी १२५० कोटींचा निधी मंजूर अलिबाग : रेवस-रेड्डी सागरी मार्गावरील आणखी एका पुलाच्या

दहा नगरपालिका हद्दीत मद्यविक्रीला ३ दिवस बंदी

नगरपालिका निवडणूक पार्श्वभूमीवर प्रशासनाचे निर्देश अलिबाग : निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार