शहापूरकरांना मिळणार मुबलक स्वच्छ पाणी

पिण्याच्या पाण्यासाठी ४० कोटींच्या योजनेला हिरवा कंदील


शहापूर : शहापूर शहराचे वाढते नागरिकीकरण लक्षात घेता शहापूर नगरपंचायतीसाठी शासनाने ४० कोटींच्या नवीन योजनेला हिरवा कंदील दिला आहे. येत्या जून महिन्यात ह्या योजनेला मंजुरी मिळणार असल्याचे आश्वासन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी शहापूरच्या शिवसेनेच्या शिष्टमंडळाला सह्याद्री अतिथी गृहात पार पडलेल्या चर्चेत दिले. वाढत्या लोकसंख्येमुळे उपलब्ध असलेल्या पाणीपुरवठा योजनेतून सद्यस्थितीत स्थानिक रहिवाश्यांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने शहापूर शहराला स्वच्छ व मुबलक पाणी मिळावे यासाठी गेल्या ७ वर्षांपासून शिवसेनेचे नेते प्रकाश पाटील, ग्रामीणचे जिल्हाप्रमुख मारुती धिर्डे व शहापूर शहरप्रमुख विजय भगत यांच्यासह स्थानिक पदाधिकारी शहापूर नगरपंचायतीला नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर होऊन मुबलक पाणी मिळावे यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू केला होता.



शहापूरला ग्रामपंचायत असताना १९८३ साली माणसी ४० लिटर पाणी वाटप गृहीत धरून योजना बनविण्यात आली होती २०११ च्या जनगणनेनुसार तेव्हा ११ हजार लोकसंख्या होती ती लोकसंख्या आता २५ हजाराच्या आसपास गेली असल्याने सद्याचा पाणीपुरवठा अपुरा पडत आहे. या योजनेला आता ४२ वर्षं झाली असून या योजनेतील पाईपलाईनला गळती व नादुरूस्ती यासारख्या अनेक तांत्रिक त्रुटी निर्माण होत आहे. ही योजना कालबाह्य झाल्याने व शहापूर शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून नागरिकीकरण होत आहे. दरम्यान शहापूर शहरासाठी ४० कोटींच्या योजनेला मंजुरी देण्यात आली असून, २०५४ पर्यंतची ५८ हजार लोकसंख्या लक्षात घेऊन माणसी १३५ लिटर पाणी मिळेल, असे नियोजन करण्यात आले आहे. योजनेतून शहापूरकरांना दररोज १०,१५ द.ल. लिटर पाणी मिळणार असल्याने येथील नागरिकांना कायमस्वरूपी मुबलक पाणी मिळणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.


नगरविकास व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी शहापूर शहराच्या नवीन पाणी पुरवठा योजनेच्या संदर्भात २२ मे २०२५ रोजी सह्याद्री अतिथी गृहात आयोजित केलेल्या बैठकीस नगर विकासचे अप्पर सचिव असीम गुप्ता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सचिव ई रवीचंद्रन, शहापुर नगरपंचायतचे मुख्याधिकारी शिवराज गायकवाड, शिवसेनेचे ग्रामीणचे ठाणे जिल्हाप्रमुख मारुती धिडें, शहरप्रमुख उपनगराध्यक्ष विजय भगत, नगरसेवक रणजीत भोईर, आनंद झगडे, इंद्रजीत सूर्यराव, रुपेश कोंडे, अजिंक्य हुलवले, भूषण शेट्टी इत्यादी पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

सात वर्षांच्या बांधकामांनंतर खड्डेमय ‘पलावा’चे उद्घाटन

७२ कोटींच्या खर्चानंतरही उड्डाणपुलाला ‘निसरडा भागा’ची उपमा मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील कल्याण-शीळ

कल्याण रेल्वे स्टेशनवर चोरांचा धुमाकूळ

कल्याण : कल्याण रेल्वे स्टेशनवर चोरीच्या दोन वेगवेगळ्या घटनांची नोंद झाली आहे, ज्यात दोन प्रवाशांकडून एकूण

ठाणे जिल्हा परिषदेची 'डोअरस्टेप डिलिव्हरी' योजना आहे तरी काय?

ठाणे: ठाणे जिल्हा परिषदेने 'डोअरस्टेप डिलिव्हरी' (Doorstep Delivery) नावाची नवीन योजना सुरू केली आहे, ज्यामुळे जिल्ह्यातील

Navratri 2025 : नवरात्री मंडपामुळे ठाण्यात 'या' भागात वाहतूक कोंडी

ठाणे: नवरात्री सणाच्या तयारीमुळे ठाण्यातील टेंभीनाका चौकात मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून येते. आजपासून येथे

कल्याणमधील रामदेव हॉटेलचा हलगर्जीपणा, फ्राईड राईसमध्ये आढळले झुरळ!

कल्याण: कल्याणमधील रामदेव या नामांकित शाकाहारी हॉटेलसंबंधित एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. या हॉटेलच्या

पतीकडून पत्नीची हत्या, शरीराचे केले १७ तुकडे

मुंबई : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात एका नराधम पतीने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या करून तिच्या शरीराचे १७ तुकडे