PM Modi: सापाला बिळातून बाहेर काढून चिरडू, मोदींचा दहशतवाद्यांवर जोरदार हल्लाबोल!

रोहतास, बिहार : जर पुन्हा डोके वर काढले, तर सापासारखं बिळातून बाहेर काढून चिरडून टाकू, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांना उद्देशून इशारा दिला आहे. रोहतास येथील सभेत बोलताना त्यांनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत पाकिस्तानलाही स्पष्ट शब्दांत इशारा दिला.


मोदी म्हणाले, “पहलगाममध्ये आमच्या बहिणींच्या कपाळावरील सिंदूर पुसणाऱ्यांना आम्ही गप्प बसू देणार नाही. मी जे वचन दिलं होतं, ते आमच्या संरक्षण दलांनी पूर्ण केलं आहे. दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आलेत. भारताची दहशतवादाविरोधातली लढाई थांबणार नाही.”



त्यांच्या या भाषणात पाकिस्तानवरही जोरदार प्रहार केला. “पाकिस्तानचा इतिहास म्हणजे दहशतवाद आणि नरसंहार. तीन वेळा आम्ही घरात घुसून उत्तर दिलंय. ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही, ही १४० कोटी भारतीयांची गर्जना आहे,” असे ते म्हणाले.


पंतप्रधानांनी यावेळी विरोधकांनाही लक्ष केलं. “जे लोक जंगलराज आणतात, गरीबांना सोडून देतात, ते आज सामाजिक न्यायाच्या नावाने गळा काढत आहेत. बिहारच्या जनतेने त्यांच्या खोट्या वचनांपासून सावध राहावं,” असं आवाहनही त्यांनी केलं.


दरम्यान, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही पाकिस्तानला इशारा देत सांगितलं, “यावेळी जर पाकिस्ताननं नापाक हरकत केली, तर कदाचित भारतीय नौदलही 'ओपनिंग' करेल.”


भारत पुन्हा कोणतीही कारवाई सहन करणार नाही. दहशतवाद्यांचा खात्मा हा केवळ सुरक्षा नव्हे, तर राष्ट्रगौरवाचाही प्रश्न आहे, हेच मोदी आणि त्यांच्या सरकारचं धोरण असल्याचं या भाषणातून ठळकपणे दिसून आलं.

Comments
Add Comment

तिथीनुसार आज राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! अयोध्येत आनंदाचे वातावरण

अयोध्या: समस्त हिंदूंच्या संस्कृतीचे प्रतिक असलेल्या राम मंदिराचा आज दुसरा वर्धापन आहे. तिथीनुसार म्हणजेच

रोखीपेक्षा डिजिटलला पसंती

एका वर्षात २,३६० एटीएमना टाळे एटीएम बंद करण्यात खासगी बँका आघाडीवर नवी दिल्ली : डिजिटल पेमेंटच्या वाढत्या

सीमा सुरक्षा दल राबवणार 'ऑपरेशन सर्द हवा', घुसखोरांना दिसताक्षणी ठार करणार

श्रीनगर : सीमा सुरक्षा दल (Border Security Force / BSF) सीमेवर जम्मू काश्मीरमध्ये 'ऑपरेशन सर्द हवा' आणि राजस्थानमध्ये 'ऑपरेशन कोल्ड

आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी

दिल्लीमधील सरकारने दिले आदेश नवी दिल्ली : भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे देशातील अनेक शहरांमधील लोक त्रस्त

काश्मिर खोरं गोठलं! तापमानात विक्रमी घसरण

श्रीनगर: हिवाळ्यात अनेकजण थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जातात. गुलाबी थंडीचा अनुभव घेण्यासाठी डिसेंबर

गुजरात एटीएसची छापेमारी! राजस्थानातून जप्त केले २२ किलो ड्रग्ज

राजस्थान: राजस्थानमधून ड्रग्ज तस्करीबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राजस्थानमधील भिवाडी इथे गुजरात