पाकिस्तान सीमेजवळील राज्यांमध्ये ३१ मेला 'ऑपरेशन शील्ड'

नवी दिल्ली: ऑपरेशन शील्डअंतर्गत आता ३१ मेला सीमेलगतच्या राज्यांमध्ये जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान, गुजरात, हरियाणा आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगडमध्ये मॉक ड्रिल केले जाणार आहे. याआधी हे मॉक ड्रिल २९ मेला होणार होते मात्र प्रशासकीय कारणांमुळे हे स्थगित करण्यात आले होते.



३१ मेला सीमेनजीकच्या राज्यांमध्ये होणार मॉक ड्रिल


याआधी ७ मेला ऑपरेशन सिंदूरच्या काही तास आधी देशभरात मॉक ड्रिल करण्यात आली होती. त्या रात्री भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या नऊ ठिकाणांना लक्ष्य करत मोठे ऑपरेशन केले होते. ऑपरेशन शील्ड अंतर्गत होणाऱ्या मॉक ड्रिलचा उद्देश सीमेनजीकच्या राज्यांमध्ये आपात्कालीन परिस्थितीशी लढण्यासाठीच्या तयारीची तपासणी करणे आहे. यात एनडीआरएफ, सिव्हिल डिफेन्स, स्थानिक पोलीस, आरोग्य विभाग आणि इतर आपात्कालीन एजन्सीचा समावेश असेल.



मॉक ड्रिलमध्ये अनेक एजन्सीचा समावेश असणार


प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यांनुसार या वेळेस मॉक ड्रिल व्यवस्थित आणि व्यावहारिक पद्धतीने लागू केला जाणार आहे. यामुळे आपात्कालीन परिस्थितीत लोकांची सुरक्षा निश्चित केली जाईल. ऑपरेशन शील्डअंतर्गत दुसरी सिव्हील डिफेन्स एक्सरसाईज ३१ मेला पाच राज्यांमध्ये आयोजित केली जाणार आहे.

Comments
Add Comment

'वन्यजीव संरक्षण अधिनियमात सुधारणा करा'

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांत बिबट्यांनी ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातही धुमाकूळ घातला आहे.

संसदेत ई-सिगारेट वादाने खळबळ; अनुराग ठाकूर यांच्या आरोपांवर टीएमसीची जोरदार प्रतिक्रिया

नवी दिल्ली : संसदेत सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेत ई सिगारेट या एका मुद्द्यावरून गदारोळ निर्माण

ऐतिहासिक सन्मान! युनेस्कोच्या वारसा यादीत 'दिवाळी'चा समावेश

नवी दिल्ली : भारताची गौरवशाली आणि निरंतर चालत आलेली परंपरा असलेल्या दीपावली सणाला अखेर जागतिक स्तरावर ऐतिहासिक

नेहरू-गांधी कुटुंबांकडून तीन वेळा मतचोरी

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आरोप फक्त दोन मते िमळूनही नेहरू झाले पंतप्रधान ! नवी दिल्ली : नेहरू-गांधी

गोवा नाईटक्लब मालक लुथरा बंधूंविरुद्ध मोठी कारवाई,पासपोर्ट निलंबित

नवी दिल्ली : गोवा पोलिसांच्या विनंतीनंतर लुथरा बंधूंचे पासपोर्ट निलंबित करण्यात आले आहेत. सरकार त्यांचे

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून