मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ११४४ कोटींच्या योजनांचा आढावा

  22

मुंबई : मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री तथा माहिती, तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड.आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.



या बैठकीत २०२४-२५ च्या योजनांची अंमलबजावणी, खर्चाचे विश्लेषण तसेच २०२५-२६ च्या नव्या योजनांची आखणी यावर सविस्तर चर्चा झाली. गेल्या आर्थिक वर्षात मंजूर कामांसाठी उपलब्ध असलेल्या ₹१०८८.७७ कोटींपैकी ९९.८ टक्के म्हणजेच ₹१०८६.७५ कोटी निधी विविध यंत्रणांना वितरित करण्यात आला होता.



यावेळी २०२५-२६ साठी एकूण ₹११४४.०२ कोटींच्या प्रस्तावित योजनांची माहिती देण्यात आली. यामध्ये सर्वसाधारण योजना ₹१०६६ कोटी, अनुसूचित जाती उपयोजना ₹७१ कोटी, तर आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजना ₹७.०२ कोटींचा समावेश आहे.

नवीन प्रस्तावांमध्ये विशेषतः झोपडपट्टी सुधारणा, पोलीस यंत्रणा बळकटीकरण, महिला व बालकल्याण आणि अपारंपरिक ऊर्जा उपक्रमांचा समावेश आहे.

प्रमुख कामे



  • झोपडपट्टी सुधारणा व पुनर्वसन : ₹५९७.४२ कोटींची नागरी दलितेतर वस्ती सुधारणा, ₹१२५ कोटींच्या संरक्षक भिंती, ₹६४.७४ कोटी दलितवस्ती योजना, तसेच ₹४.५ कोटींचे कौशल्य विकास कार्यक्रम.

  • पोलीस व तुरुंग विभाग : पायाभूत सुविधांसाठी, वाहने व संगणकीय साधने पुरवण्यासाठी ₹१४.०६ कोटींचा निधी

  • आपत्कालीन व महसूल यंत्रणा : गतीशील प्रशासनासाठी ₹४.५ कोटींचा निधी.

  • महिला व बाल विकास : बालगृहांसाठी सीसीटीव्ही आणि संस्थांचे बळकटीकरणासाठी ₹१४.०६ कोटी निधी.

  • सौरऊर्जा उपक्रम : ₹२ कोटींच्या सौर संचांची उभारणी.


या बैठकीत लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदारसंघातील समस्या मांडल्या असून, त्या सोडवण्यासाठी संबंधित विभागांनी तत्काळ कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्री ॲड. शेलार यांनी दिले.

बैठकीस खासदार, आमदार, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी व अंमलबजावणी यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.
Comments
Add Comment

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी

सहकारातून प्रथमच पंपस्टोरेज प्रकल्प; १००८ कोटी रुपये गुंतवणूक, २४० मेगावॉट वीजनिर्मिती मुंबई : महाराष्ट्राने

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता