GT vs MI, IPL 2025: गुजरातचा खेळ संपला, मुंबई क्वालिफायर २मध्ये दाखल

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या एलिमिनेटर सामन्यात आज मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सचा खेळ खल्लास केला. एलिमिनेटर सामन्यात मुंबईने गुजरातला २० धावांनी हरवले.


मुंबईने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत २२८ धावा केल्या. गुजरातसमोर विजयासाठी २२९ धावांचे आव्हान होते. मात्र गुजरातला हे आव्हान पूर्ण करता आले नाही आणि त्यांचा पराभव झाला. गुजरातसाठी साई सुदर्शनने जबरदस्त ८१ धावांची खेळी केली मात्र ही खेळी त्याला विजय मिळवून देण्यासाठी पुरेशी ठरली नाही. गुजरातने २० षटकांत ६ बाद २०८ धावांची खेळी केली.

दोन्ही संघादरम्यानचा हा सामना मुल्लांपूर येथील महाराजा यादविंद्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये रंगला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजी केली. पहिल्यांदा फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने धुंवाधार धावा केल्या.


मुंबई इंडियन्सने २० षटकांत तब्बल ५ बाद २२८ धावा ठोकल्या होत्या. आज मुंबईचे फलंदाज चमकले. सुरूवातीला जॉनी बेअरस्ट्रॉ आणि रोहित शर्मा यांनी दमदार सुरूवात केली. सलामीवीर रोहित शर्माने या सामन्यात ८१ धावा ठोकल्या. यात त्याने ५० बॉलमध्ये ९ चौकार आणि ४ षटकार ठोकले.


तर सलामीवीर जॉनी बेअरस्ट्रॉने ४७ धावांची खेळी केली. सूर्यकुमार यादवला या सामन्यात ३३ धावा ठोकल्या. तर तिलक वर्मा २५ धावांची खेळी करून बाद झाला. नमन धीरला केवळ ९ धावा करता आल्या.


एलिमिनेटर सामन्यात जो संघ पराभूत होईल तो संघ स्पर्धेतून बाद होईल. तर विजेता संघ क्वालिफायर २ सामन्यात पंजाब किंग्सचा सामना करणार आहे. क्वालिफायर २ चा सामना १ जूनला अहमदाबाद येथे खेळवला जाणार आहे.


गुजरातची प्लेईंग ११ - शुभमन गिल(कर्णधार), साई सुदर्शन, कुशल मेंडिस(विकेटकीपर), शाहरूख खान, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, रशीद खान, आर. साई किशोर, गेराल्ड कोएत्जी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.


मुंबई इंडियन्सचे प्लेईंग ११- रोहित शर्मा, जॉनी बेअरस्ट्रॉ(विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या(कर्णधार), नमन धीर, राज बावा, मिचेल सँटनर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, रिचर्ड ग्लीसन.

Comments
Add Comment

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma :घटस्फोटानंतर पुन्हा एकत्र येणार ? चहल म्हणाला..

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma : भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि चहलची पुर्व पत्नी हे ईनफ्लुन्सर धनश्री वर्मा हे दोघेजन पुन्हा

मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर दुटप्पी!

मोहम्मद कैफ याचे संघ व्यवस्थापनावरही गंभीर आरोप नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय

मुंबई इंडिन्सचा गुजरात जायंट्सवर सात बळी राखून विजय

कर्णधार हरमनप्रित कौरची आक्रमक खेळी नवी मुंबई : विजयासाठी १९३ धावांचे आव्हान घेवून मैदानात उतरलेल्या मुंबई

शिखर धवनच्या आयुष्यात नवी इनिंग! सोफी शाइनसोबत उरकला साखरपुडा

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर शिखर धवनने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा गाठत

आयसीसी क्रमवारीतील अव्वल स्थानाकडे विराट कोहलीची वाटचाल

वडोदरा : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानाला आता धोका

महिला प्रीमियर लीग: हरमनप्रीत-सायव्हरचा झंझावात

मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्सवर ५० धावांनी विजय मुंबई : वानखेडे स्टेडियमवर महिला प्रीमियर लीगच्या तीसऱ्या