पूर परिस्थितीच्या अंमलबजावणीसाठी प्रशासन सज्ज

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश


ठाणे  : जून ते सप्टेंबर या कालावधीत राज्यात व जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने तसेच यावर्षी मान्सून लवकर दाखल झाल्याने पहिल्याच पावसात तात्पुरत्या स्वरूपाची पुरपरिस्थिती निदर्शनास आली आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी जिल्ह्यातील यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश दिले असून, विस्तृत उपाययोजना अंमलात आणल्या जात आहेत.


प्रमुख उपाययोजना : आपत्ती व्यवस्थापन कक्षांचा समन्वय
जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन कक्ष पुरस्थितीवर दैनंदिन नियंत्रण ठेवत आहे.


आरोग्य पथकांची तैनात
मोठ्या लोकसंख्येच्या गावात २ महिला व २पुरुष कर्मचारी, तर लहान गावात १ महिला व १ पुरुष कर्मचारी २४x७ सेवा देणार.


पुरेसा औषधसाठा व शुद्धीकरण साहित्य
TCL पावडर, मेडीक्लोर इत्यादी पाणी शुद्धीकरण साहित्य ग्रामपंचायतीमध्ये उपलब्ध करून ठेवण्याच्या सूचना.


दैनंदिन रुग्ण सर्वेक्षण
घराघरांत आशा व आरोग्य कर्मचारी भेट देऊन ताप, जुलाब, सर्दी, अतिसार यांचे सर्वेक्षण करून आढळलेल्या रुग्णांवर तातडीचे उपचार व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणार.


किटकजन्य आजार नियंत्रण
तापाचे रुग्ण आढळणाऱ्या भागात रक्तनमुने गोळा करून तपासणी. चिकनगुनिया/डेंग्यू संशयित ठिकाणी रक्तनमुने प्रयोगशाळेत पाठवणार. डासोत्पत्ती स्थळी अळीनाशक फवारणी.


विस्थापितांसाठी आरोग्य सेवा
पाण्यामुळे घर सोडलेल्या नागरिकांसाठी शाळा/ देवालये वैद्यकीय पथकांमार्फत तपासणी व औषधोपचार.


आरोग्य शिक्षण व जनजागृती
मायकिंग, भित्तीपत्रके व इतर माध्यमांतून स्वच्छतेबाबत आणि टाळावयाच्या गोष्टींबाबत माहितीप्रसार. पाणी गुणवत्ता नियंत्रण


गरोदर मातांची विशेष काळजी
संभाव्य प्रसूती तारीख लक्षात घेऊन उच्च जोखमीच्या गरोदर महिलांची यादी. गरजेनुसार त्यांना आरोग्य संस्थांमध्ये हलवले जाणार.


सर्पदंश आणि विंचूदंश उपचार व्यवस्था
संबंधित औषधांचा पुरेसा साठा सर्व प्राथमिक केंद्रांवर उपलब्ध. प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नेमणूक.
ही सर्व उपाययोजना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्धपणे राबविण्यात येत असून, पुरपरिस्थितीत जिल्हा प्रशासन सज्ज आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. दिनेश सुतार यांनी दिली आहे.


Comments
Add Comment

डोंबिवलीत मनसेला खिंडार!

दोन माजी नगरसेवक व नगरसेविका भाजपमध्ये डोंबिवली  : मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष आणि डोंबिवली पश्चिमेतील

जलमापक सहा महिन्यांपासून बंद; पाणीपुरवठा खंडित होणार

नादुरुस्त जलमापक बदलण्यासाठी पालिकेची मोहीम भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेकडून शहरातील जलमापक जर सहा

प्रचार तोफा थंडावण्यापूर्वी मतदानाच्या तारखांमध्ये केला बदल, निवडणूक अधिकाऱ्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण

ठाणे: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील निवडणूकीच्या प्रचार तोफा आज थंडावणार आहेत.

बाल हक्क आयोगाचे कडोंमपा अधिकाऱ्यांवर चौकशीचे आदेश

ड्रेनेजमध्ये पडून बालक मृत्यूप्रकरण कल्याण  : कल्याण-डोंबिवली पालिकेच्या निष्काळजीपणामुळे डोंबिवली येथे

भिवंडीत विकासकाकडून १०० कोटींचा घोटाळा?

फसवणूक झालेल्या कुटुंबाचे आ. संजय केळकर यांना साकडे ठाणे  : भिवंडीजवळील खारबाव येथे सुरू असलेल्या इमारत

डोंबिवलीत सापडला महिलेचा मृतदेह; पती फरार

डोंबिवली : कल्याण-शिळ महामार्गावरील कोळेगाव परिसरात बुधवारी सकाळी किरकोळ घरगुती वादातून पत्नीची गळा आवळून