पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांची जम्मू काश्मीरकडे पाठ

  74

विदेशी पर्यटकांनी २०२६ चेही बुकींग केले रद्द


काश्मिर : २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलली होती. ऑपरेशन सिंदूर राबवत दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्थ केले होते. दरम्यान, पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटकांनी जम्मू काश्मीरकडे पाठ फिरवल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. काही विदेशी पर्यटकांकडून २०२६ चे जम्मू काश्मीरचे बुकिंग रद्द करण्यात आले आहे. इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटरचे प्रमुख दीपक मनवानी यांनी याबाबतची माहिती दिली आहे.


डियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटरचे प्रमुख दीपक मनवानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, इटलीसह जगभरातील अनेक देशातील पर्यटकांकडून जम्मू काश्मीरचे बुकिंग रद्द करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटन सुरु करायचे असेल तर आपले एक डेलीगेशन अनेक देशात जाऊन एडवाइजरी हटवण्याची मागणी करायला हवी असे ते म्हणाले. पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरचे पर्यटन विस्कळीत झालेले पाहायला मिळत आहे. आता जम्मू काश्मीरचे पर्यटन हळूहळू सुरु होत आहे. पण अद्याप आंतरराष्ट्रीय पर्यटक जम्मू काश्मीरकडे आलेले नाहीत.


आंतरराष्ट्रीय पर्यटकांनी २००६ चे ही बुकिंग रद्द केल्याची माहिती इंडियन असोसिएशन टूर ऑपरेटरचे प्रमुख दीपक मनवानी यांनी दिली आहे. भारतातील तसेच परदेशातील पर्यंटक काश्मिरशिवाय राहूच शकत नाही. जगातील सर्वांधिक सुंदर पर्यटन स्थळ जम्मू-काश्मिर असल्याने काही दिवसानंतर दहशतवादी हल्ल्यांचा प्रभाव पर्यंटक विसरुन जातील व जम्मू-काश्मिरला पुन्हा गर्दी करतील, असा दावा पर्यंटक अॅड. राहूल पवार यांनी व्यक्त केला आहे.



अमरनाथ यात्रा यशस्वी झाली तर सगळे सुरळीत होईल


आंतरराष्ट्रीय पर्यटकांनी जम्मू काश्मीरच्या २०२६ च्या बुकिंग रद्द केल्या आहेत. जर हे सुरु करायचे असेल तर इतर देशांनी लावलेल्या एडवाइजरी काढव्या लागतील असे दीपक मनवानी म्हणाले. आपल्याला देशातून डेलीगेशन पाठवावे लागेल आणि सांगावे लागेल की जम्मू काश्मीर सुरक्षित आहे. अमरनाथ यात्रेसाठी आंतरराष्ट्रीय पर्यटक नोंदणी करतील का? हे ही मुश्किल आहे. त्यांना आणावे लागेल. येत्या ६ महिन्यांमध्ये जर अमरनाथ यात्रा यशस्वी झाली तर सगळे सुरळीत होईल त्यामुळे मग पर्यटन वाढेल आणि पर्यटक येतील असे दीपक मनवानी म्हणाले.


टूरिस्ट कंपनी जे आहेत ते ही नीट पॅकेज तयार करत आहेत. पण अमरनाथ यात्रेमुळे सुरक्षिततेचा विषय समोर येईल. त्यांनतरच आंतरराष्ट्रीय पर्यटक आणि इतर पर्यटक येतील असे दीपक मनवानी म्हणाले.

Comments
Add Comment

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके

लष्करी अधिकाऱ्याकडून स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण, श्रीनगर विमानतळावर नेमके घडले काय?

एका कर्मचाऱ्याच्या पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर आणि जबड्याला गंभीर दुखापत श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील श्रीनगर

‘इस्राो’ची मंगळ तयारी

नवी दिल्ली : ३१ जुलै रोजी इस्रोने लडाखच्या त्सो कार या दुर्गम आणि मंगळ ग्रहासारख्या भासणाऱ्या प्रदेशात आपल्या

सैन्याच्या शौर्याचा काँग्रेसकडून सतत अपमान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसीत आरोप वाराणसी  : ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे यशस्वी झाले आहे, पहलगामचे