रिकल्टन, बॉश, जॅक्स मायदेशी रवाना

मुंबईला प्लेऑफ आधीच मोठा धक्का


मुंबई : मुंबई इंडियन्स संघाला प्लेऑफ आधीच मोठा झटका बसला आहे. मुंबई इंडियन्सचे महत्त्वाचे खेळाडू विकेटकिपर फलंदाज रायन रिकल्टन, ऑलराउंडर कॉर्बिन बॉश आणि विल जॅक्स यांना राष्ट्रीय कर्तव्यामुळे मायदेशी परतावे लागले आहे. आता आयपीएलच्या उर्वरित सामन्यांचा ते भाग नसतील. मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे.

रायन रिकल्टन आणि कॉर्बिन बॉश हे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिकन टीमचा भाग आहेत. विल जॅक्सचा वेस्ट इंडिज विरुद्ध होणाऱ्या वनडे सीरीजसाठी टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. म्हणून हे तिन्ही खेळाडू मायदेशी निघून गेले आहेत. मुंबई इंडियन्सने एक व्हीडिओ शेअर केला आहे. या व्हीडिओत हेड कोच महेला जयवर्धने यांनी या खेळाडूंना निरोप दिला. मी स्टाफ आणि टीमच्या वतीने रायन आणि बोस्कीला टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी शुभेच्छा देतो. चांगले खेळा. त्याचप्रमाणे तुम्ही शानदार प्रदर्शन केले आहे. तुम्हाला जाताना पाहून दु:ख होतय. पण तुम्हाला शुभेच्छा, असे जयवर्धने यांनी आफ्रिकी क्रिकेटपटूंसाठी म्हटले आहे.


तसेच रायन रिकल्टन मुंबईकडून सलामीला यायचा. त्याने अनेक सामन्यात दमदार सलामी दिली. रायन रिकल्टनने आपल्या फलंदाजीच्या जोरावर अनेकदा टीमला अडचणीतून बाहेर काढले. कॉर्बिन बॉशने आपल्या ऑलराऊंडर क्षमतेने टीमच संतुलन वाढवले. विल जॅक्सने सुद्धा मीडिल ऑर्डरमध्ये वेगाने धावा बनवल्या. त्यामुळे निश्चित प्लेऑफमध्ये मुंबई इंडियन्सला या तीन खेळाडूंची कमतरता जाणवू शकते. या तिघांच्या जागी मुंबई इंडियन्सने इंग्लंडचा अनुभवी विकेटकिपर फलंदाज जॉनी बेयरस्टो, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज रिचर्ड ग्लीसन आणि श्रीलंकेचा फलंदाज चरिथ असलंका यांचा टीममध्ये समावेश
केला आहे.



आयपीएलच्या बाद फेरीचे वेळापत्रक


गुरुवार, २९ मे २०२५ - क्वालिफाय १, पंजाब विरुद्ध बंगळूरु
शुक्रवार, ३० मे २०२५ - एलिमिनेटर, मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात
रविवार, १ जून २०२५ - क्वालिफाय २
मंगळवार, ३ जून - अंतिम सामना, अहमदाबाद

Comments
Add Comment

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma :घटस्फोटानंतर पुन्हा एकत्र येणार ? चहल म्हणाला..

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma : भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि चहलची पुर्व पत्नी हे ईनफ्लुन्सर धनश्री वर्मा हे दोघेजन पुन्हा

मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर दुटप्पी!

मोहम्मद कैफ याचे संघ व्यवस्थापनावरही गंभीर आरोप नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय

मुंबई इंडिन्सचा गुजरात जायंट्सवर सात बळी राखून विजय

कर्णधार हरमनप्रित कौरची आक्रमक खेळी नवी मुंबई : विजयासाठी १९३ धावांचे आव्हान घेवून मैदानात उतरलेल्या मुंबई

शिखर धवनच्या आयुष्यात नवी इनिंग! सोफी शाइनसोबत उरकला साखरपुडा

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर शिखर धवनने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा गाठत

आयसीसी क्रमवारीतील अव्वल स्थानाकडे विराट कोहलीची वाटचाल

वडोदरा : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानाला आता धोका

महिला प्रीमियर लीग: हरमनप्रीत-सायव्हरचा झंझावात

मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्सवर ५० धावांनी विजय मुंबई : वानखेडे स्टेडियमवर महिला प्रीमियर लीगच्या तीसऱ्या