IPL 2025 : एक विजय आणि सरळ फायनलमध्ये एंट्री!

  62

फायनलसाठी एक पाऊल विजयाचे


आयपीएल २०२५ च्या हंगामाचे साखळी सामने संपलेत आणि आता खऱ्या अर्थाने चुरस सुरू झालीये ती ट्रॉफी जिंकण्यासाठी. आज २९मेला पहिला क्वालिफायरचा सामना पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात रंगत आहे. पंजाब किंग्सने मुंबईला हरवत अव्वल स्थान मिळवलंय तर आरसीबीने लखनऊचा पराभव करत टॉप २ मध्ये एंट्री केली. त्यातच आता पहिल्या क्वालिफायरमध्ये जो जिंकणार आहे त्याला सरळ फायनलमध्ये एंट्री मिळणार आहे. चला थोडक्यात आढावा घेऊया...



आज २९ मे आयपीएल २०२५ मधील पहिला क्वालिफायर सामना. मुल्लांलपूरमध्ये आज सामना रंगणार आहे तो आयपीएल २०२५च्या फायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी. पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ एकमेकांविरुद्ध उभे ठाकणार आहेत ते ट्रॉफी जिंकण्याच्या इराद्यानेच..दोन्ही संघांनी आतापर्यंतच्या हंगामात एकापेक्षा एक सरस कामगिरी केलीये. त्यामुळे दोन्ही संघाचे जोश हाय आहेत. टॉप २ मध्ये स्थान मिळवल्यानंतर दोन्ही संघ फायनलमध्ये पोहोचतील अशी आशा व्यक्त केली जात आहे. कारण पहिला क्वालिफायरचा सामना गमावल्यानंतर फायनलमध्ये पोहोचण्याची आणखी एक संधी या संघांना असणार आहे. पंजाब किंग्स संघानं २०१४ नंतर पहिल्यांदा प्लेऑफमध्ये स्थान मिळवलंय. याचं संपूर्ण श्रेय श्रेयस अय्यर आणि हेड कोच असलेल्या रिकी पॉंटिंगला जातं. दुसरीकडे असा संघ आहे ज्यांना नॉकआऊटमध्ये बऱ्याचवेळा पराभवाचा सामना करावा लागला. गेल्या १८ वर्षात आरसीबीला एकदाही विजेतेपद मिळवता आलेलं नाही त्यामुळे हा दुष्काळ संपवण्याचा त्यांचा जरूर प्रयत्न असेल.



पंजाब किंग्समध्ये अय्यर आणि पाँटिंगची जोडी चांगलीच जमली. या जोडीनं लीग स्टेजमध्ये सुरूवातीपासूनच दमदार कामगिरी केली आणि ती शेवटपर्यंत टिकवून ठेवली. तसेच संघातील प्रत्येक खेळाडूकडून उत्कृष्ट कामगिरी करवून घेतली आहे. त्यामुळेच हा संघ मजबूत ठरला आहे. प्रभसिमरन सिंह, प्रियांश आर्य, श्रेयस अय्यर, जोश इंग्लीश, फिनिशर शशांक सिंह सातत्याने आपला खेळ चांगला करत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून चांगल्या खेळीची अपेक्षा असेलच. दुसरीकडे आरसीबी गेल्या काही वर्षांपासून आपल्या वरच्या फळीतील फलंदाजांवर अवलंबून आहे. मात्र जितेश शर्मासारख्या खेळाडूंनी मधल्या फळीत येताना आपली क्षमता दाखवल्याने असे वाटत आहे की बदल होतोय. जितेशने मंगळवारी रात्री लखनऊविरुद्ध आपल्या करिअरमधील सर्वोत्कृष्ट खेळी केली आणि यामुळे प्लेऑफमध्ये जाण्याआधी त्याचा आत्मविश्वास दुणावला आहे.


आरसीबीच्या संघाने साखळी गटात पंजाब किंग्सला हरवले होते त्यामुळे त्याच प्रेरणेने ते आज मैदानात उतरतील. दोन्ही संघ पहिल्या बॉलपासूनच फायनलमध्ये पोहोचण्यासाठी प्रयत्न करतील. त्यामुळे पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामना चुरशीचा होईल हे नक्की.

Comments
Add Comment

हुंड्याऐवजी मुलींसाठी फिक्स डिपॉझिट

मराठा समाजाची लग्न आचारसंहिता अहिल्यानगर : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणानंतर मराठा समाजातील

आणिक आगार ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत धावणार मेट्रो

मुंबई : मुंबईतील मुख्य पर्यटन आकर्षणांपैकी एक असलेल्या 'गेट वे ऑफ इंडिया'ला भुयारी मेट्रोतून जाता येणार आहे. गेट

डॉक्टरांसाठी ‘क्यूआर कोड’ प्रणाली अनिवार्य

बोगस डॉक्टरांना बसणार आळा पुणे : राज्यातील बोगस डॉक्टरांच्या वाढत्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी आता

भाऊरायांना राखी पाठवण्यासाठी पोस्ट ऑफिस सज्ज, पावसाची चिंता मिटली; राखीसाठी वॉटरप्रूफ लिफाफा

पुणे (वार्ताहर) : दूरगावी असणाऱ्या भावाला आपली प्रेमाची राखी पाठविण्यासाठी सध्या बहिणींची लगबग सुरू आहे. तसेच

येमेनजवळ मोठी दुर्घटना, आफ्रिकन स्थलांतरितांची बोट बुडाली, ६० हून अधिक जणांचा मृत्यू

सना, येमेन: येमेनच्या किनाऱ्यावर रविवारी एक भीषण बोट दुर्घटना घडली, ज्यात ६० हून अधिक आफ्रिकन स्थलांतरितांचा

रक्षाबंधन २०२५: 'या' वेळेत चुकूनही बांधू नका राखी

मुंबई: भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण २०२५ मध्ये शनिवार, ९ ऑगस्टला साजरा केला जाईल. या