पालीत नागरिकांचे आरोग्य संकटात

खोपोली महामार्गावर रासायनिक कचऱ्याचा खच


सुधागड-पाली : पाली-खोपोली महामार्गावरील दापोडे गावाजवळ मोठ्या प्रमाणावर रासायनिक कचरा टाकण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. एस्सार पेट्रोल पंपाच्या शेजारी हा कचरा खुलेआम फेकण्यात आला असून मुसळधार पावसामुळे तो पाण्यात मिसळत थेट आंबा नदीत पोहोचत आहे. हीच नदी पाली शहरातील हजारो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत असल्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.


आरोग्याला धोका; नागरिकांची चिंता
स्थानिक ग्रामस्थांनी या घटनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून दूषित पाणी पिल्याने त्वचेचे विकार, पचनतंत्राच्या समस्या, गंभीर आजार आणि कॅन्सर यांचा धोका निर्माण झाला आहे. तसेच, परिसरातील शेती, जंगलातील वन्यजीव आणि पशुपक्ष्यांवरही या प्रदूषणाचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.


प्रशासनाची उदासीनता ही कोणाची जबाबदारी?
प्रदूषण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी यावर कोणतीही ठोस प्रतिक्रिया दिली नसल्याचे स्थानिकांनी निदर्शनास आणले आहे. सुधागड तहसीलदार उत्तम कुंभार यांच्याशी संपर्क साधण्यात आला असता त्यांनी प्रदूषण महामंडळ आणि पोलीस प्रशासनाला तपासणीसाठी पत्र पाठवल्याचे सांगितले, मात्र आत्तापर्यंत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. रासायनिक कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य आणि पर्यावरण गंभीर संकटात सापडले आहे. प्रशासनाने यावर त्वरित कारवाई करून संबंधित दोषींवर कठोर उपाययोजना करणे आवश्यक आहे. तसेच, रासायनिक कचरा नियंत्रित करण्यासाठी आणि पाणी प्रदूषण रोखण्यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करण्यास प्रशासनाने संपूर्णतः जबाबदार राहिले पाहिजे. स्थानिकांनी या प्रश्नावर जागरूकता वाढवून आणि अधिकाऱ्यांवर दबाव टाकून त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली पाहिजे.

Comments
Add Comment

पनवेल महापालिकेसाठी मतमोजणी सुरू

पनवेल : पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी आज मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या

महाडमध्ये ५ गट आिण १० गणांसाठी २०३ मतदान केंद्र

१६ ते २१ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत महाड वार्तापत्र संजय भुवड महाड : तालुक्यात ५ जिल्हा

नवी मुंबई विमानतळाने ओलांडला १ लाख प्रवाशांचा टप्पा

विमान उड्डाणांच्या संख्येत लक्षणीय वाढ नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने (एनएमआयए) एका

पनवेल–कळंबोली दरम्यान पॉवर ब्लॉक

पनवेल : डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन (डीएफसीसी) प्रकल्पाच्या अनुषंगाने, किमी ६३/१८ ते ६३/२४ दरम्यान ११०

जिल्ह्यातील १८१ आदिवासी वाड्या रस्त्याविना

अलिबाग : आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहासोबत आणण्याचा आणि त्यांचा सर्वांगीण विकास घडवून यावा, या उद्देशाने

अवचित गडाचा मार्ग आता होणार सुखकर

खारापटीतील तरुणांनी केली रस्ता दुरुस्ती रोहा : ऐतिहासिक वारसा असलेल्या अवचित गडावर जाणाऱ्या रस्त्याची