शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मिळाला तीन कोटींचा निधी

अलिबाग : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सक्षम करण्यासाठी जिल्हा नियोजनतर्फे तीन कोटींचा निधी वितरित झाला. यामधून विविध मशीन खरेदी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे रुग्णांच्या आजाराचे योग्य निदान आणि उपचार जलद होणार असून, विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी उपयुक्त होणार आहे.


अलिबागच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय २०२१ मध्ये सुरू झाले. रुग्णांना योग्य उपचाासाठी महाविद्यालयाचे प्रयत्न सुरू होते. २०२४-२५ या वर्षासाठी महाविद्यालयाला मशीन, उपकरणे खरेदीसाठी तीन कोटी निधी जिल्हा नियोजन समितीने मंजूर करून वर्ग केला होता. हा मोठा निधी आता मिळाला आहे. जिल्हा नियोजनाच्या निधीमधून ईएनटी ऑपरेटिंग मायक्रोस्कोप, श्वासनलिकेचे ब्रोपोस्कॉप यंत्र, पिजी पेंटाहेड मायक्रोस्कोप, हाडांची घनता मोजण्यासाठी उपकरणे, भूल देण्याचे काम करण्याचे ठिकाण ही उपकरणे खरेदी केली आहेत. या उपकरणामुळे आजाराचे योग्य निदान व उपचार केले जाणार आहेत.वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यापासून जिल्हा रुग्णालयात रुग्णावर योग्य उपचार होत आहेत.


डॉक्टर उपलब्ध असल्याने जिल्हा रुग्णालयातच उपचार मिळणे शक्य झाले आहे. नवीन उपकरणांमुळे कण्यासाठी आणि रुग्णाच्या आजारावर निदान करणे सोयीचे असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. पूर्वा पाटील यांनी सांगितले.

Comments
Add Comment

'या' दिवशी सुरू होणार नेरळ माथेरान मिनी ट्रेन

नेरळ : ब्रिटीश काळात १९०७ साली सर आदमजी पिरभाय यांनी माथेरानात मिनी ट्रेन सुरू केली. दरवर्षी १४ जून रोजी

श्रीवर्धन येथे किनाऱ्यालगत आढळली बोया, मेरिटाईम बोर्डच्या अधिकाऱ्यांनी केला तात्काळ तपास

रायगड: श्रीवर्धन येथील खालचा जीवनाबंदर कोळीवाडा परिसरात पाण्याच्या लाटांसोबत सकाळी आठ वाजताच्या दरम्यान एक

मध्य रेल्वेच्या कर्जत यार्डचे आधुनिकीकरण, प्रवास होणार वेगवान!

कर्जत: मध्य रेल्वेने कर्जत यार्ड आधुनिकीकरणाच्या दिशेने मोठे आणि महत्वाचे पाऊल टाकले आहे. यामुळे केवळ रेल्वे

मच्छीमारांसाठी दिवाळी हंगाम सुगीचा

मुरुड-जंजिरा:पर्यटकांना ताजी मासळी पापलेट, सुरमई, रावस, जिताडा, कोळंबीसह दिवाळीच्या सुटीत वर्षभर पुरेल एवढे ताजे

भूषण पतंगे मृत्युप्रकरणी निष्पक्ष चौकशी व्हावी

ताराराणी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षांची मागणी अलिबाग  : बनावट नोटा प्रकरणातील आरोपी भूषण पतंगेच्या मृत्यूने

पोहोच रस्त्याच्या भूसंपादनात शेतकऱ्यांना न्याय द्या

अलिबाग  : शहापूर येथील एमआयडीसी पोहोच रस्त्याच्या भूसंपादनाबाबत शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी शहापूर