टिटवाळा परिसरात तरुणावर जीवघेणा हल्ला

  53

डोंबिवली : टिटवाळा परिसरातील वडवली गावात एका २९ वर्षीय तरुणावर तिघा अज्ञातांनी निर्घृण हल्ला केला. मिरची पावडर डोळ्यात फेकून त्याच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार करण्यात आले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणावर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


सर्वेश वासुदेव पाटील असे या जखमी तरुणाचे नाव असून तो चिकनचा पुरवठा करण्याचे काम करतो. मंगळवारी दुपारी तो आपल्या मित्रासह स्कुटरवरून ऑर्डर देण्यासाठी जात असताना ऍक्टिव्हावर आलेल्या तिघांनी त्याच्यावर हल्ला केला. डोळ्यात मिरची पावडर टाकून लोखंडी रॉडने डोक्यावर मारहाण करण्यात आली.


या प्रकरणी सर्वेशने कल्याण ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अविनाश वेदांश पाटील, मनीष दत्तात्रय पाटील आणि विनेश मनोहर पाटील या तिघांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सध्या आरोपी फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.


हल्ल्याचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी, प्रकरण वैयक्तिक वादातून घडले असावे, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. अधिक तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

माजी बँक अध्यक्ष 'फरार' घोषित!

मुंबई: १२२ कोटी रुपयांच्या गैरव्यवहार घोटाळ्याप्रकरणी एस्प्लेनेड न्यायालयाने 'न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह

मुंबईतील धक्कादायक घटना, एसी कोचच्या टॉयलेटमध्ये पाच वर्षांच्या मुलाचा मृतदेह

मुंबई : मुंबई - कुशीनगर एक्सप्रेसच्या एसी कोचच्या टॉयलेटमध्ये पाच वर्षांच्या मुलाचा मृतदेह आढळला. ही घटना

सायबर हल्लेखोरांच्या यादीत भारत जगात अव्वल

नवी दिल्ली: भारतासाठी एक अत्यंत चिंताजनक बाब समोर आली आहे. स्विस सायबर सुरक्षा फर्म 'अ‍ॅक्रोनिस'ने नुकत्याच

पुण्यातील दौंडमध्ये दोन गाड्यांची समोरासमोर धडक, झाला भीषण अपघात

पुणे : दौंड तालुक्यातील यवत परिसरात पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर यवत पोलिस स्टेशन हद्दीत दोन कारची

आठवीच्या विद्यार्थ्याने दहावीच्या विद्यार्थ्यावर केला चाकूने वार ! उपचारादरम्यान मृत्यू

अहमदाबाद: गुजरातच्या अहमदाबादमध्ये घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण

बारावीच्या विद्यार्थ्याने एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेवर पेट्रोल टाकून पेटवले

भोपाळ: एकतर्फी प्रेमातून एका १८ वर्षीय विद्यार्थ्याने आपल्या २६ वर्षीय शिक्षिकेवर पेट्रोल टाकून तिला पेटवून