Elon Musk: एलॉन मस्क यांनी सोडली अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची साथ

वॉशिंग्टन: टेस्ला आणि स्पेस एक्सचे प्रमुख एलॉन मस्क यांनी घोषणा केली आहे की त्यांचा अमेरिकन सरकारमध्ये विशेष कर्मचारी(SGE) म्हणून १३० दिवसांचा कार्यकाळ संपत आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिलेकी, मी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना सरकारी खर्च कमी करण्यासाठी दिलेल्या संधीबाबत आभार मानतो. DOGE मिशन वेळेसोबत अधिक मजबूत होत जाईल.


Department of Government Efficiency (DOGE) हे एक प्रशासकीय इनोव्हेशन होते. यात मस्क यांना सरकारी खर्चात कपात आणि दक्षता वाढवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. या अभियानाच्या माध्यमातून अनावश्यक सरकारी खर्चाची ओळख करण्यात आली. परकीय मदत आणि सार्वजनिक प्रसारणावर कमी खर्च करण्याचे सल्ले देण्यात आले. NPR, PBS आणि परकीय सहाय्यतेच्या कार्यक्रमांमध्ये $9.4 बिलियन कपातीचा प्रस्ताव ठेवण्यात आला. हे पाऊल सरकारी सुधारणा आणि वायफळ खर्च संपवण्याच्या दिशेने उचलण्यात आले होते.





काही दिवसांपूर्वी असे सांगितले जात होते की DOGEचे कामकाज पाहत असल्याने ते आपल्या कारभारावर फोकस करू शकत नव्हते. व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने दुजोरा दिला आहे की मस्क अमेरिकन सरकारची साथ सोडत आहेत. मस्क यांनी १३० दिवस अमेरिकन सरकारमध्ये विशेष कर्मचारी म्हणून काम केले होते.

 
Comments
Add Comment

सुशीला कार्की नेपाळच्या नव्या हंगामी पंतप्रधान

नेपाळची संसद बरखास्त, हंगामी सरकारचे नेतृत्व करणार नवी दिल्ली : नेपाळमध्ये मागील काही दिवसांपासून मोठ्या

‘या’ देशातील ९९ टक्के लोक वापरत नाहीत सोशल मीडिया

इंटरनेट सुविधा अत्यंत मर्यादित नैरोबी : आजकाल प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन दिसतो, ज्यात सोशल मीडियावर लोक

रशियामध्ये महाभयंकर भूकंप! त्सुनामीचा इशारा जारी

मॉस्को: शनिवारी रशियाच्या कामचटका द्वीपकल्पाच्या पूर्व किनाऱ्याजवळ भूकंपाचे धक्के बसले आहेत, ज्याची तीव्रता

काँगोमध्ये बोट उलटल्या, १९३ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये बहुतेक विद्यार्थी

काँगो: आफ्रिकन देश काँगोमधून एक मोठी बातमी येत आहे. येथील वायव्य इक्वेटूर प्रांतात झालेल्या दोन वेगवेगळ्या बोट

माजी सरन्यायाधीश सुशील कार्की यांच्या हाती नेपाळचे नेतृत्व, राष्ट्रपतींनी दिली शपथ

काठमांडू: नेपाळमधील राजकीय अस्थिरता आणि 'जनरेशन झेड' (Gen-Z) तरुणाईच्या जोरदार आंदोलनानंतर अखेर

Nepal News : भारतीय पर्यटकांवर नेपाळमध्ये हल्ला; प्रवाशांचे मोबाईल-रोख रक्कम लुटली अन् सर्वांना तातडीनं...

काठमांडू : नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीविरोधात सुरू झालेल्या आंदोलनाला आता हिंसक वळण मिळालंय. गेल्या काही