Emran Hashmi : बॉलीवूड अभिनेता इमरान हाशमीला डेंग्यूची लागण, रुग्णालयात दाखल

मुंबई : बॉलीवूडमधील अभिनेता इमरान हाशमीचा फॅन फॉलोविंग जबरदस्त आहेत. नुकताच त्याचा ग्राउंड झिरो नावाचा चित्रपट रिलीज झाला होता. मात्र, चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. आता इमरान त्याच्या आगामी चित्रपटाची शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्याला डेंग्यूची लागण झाली असल्याची बातमी समोर आली आहे.


मीडिया रिपोर्टनुसार, बॉलीवूडचा स्टार अभिनेता इमरान हाशमी याला डेंग्यू झालेला आहे. तो पावर स्टार पवन कल्याणसोबत 'ओजी' चित्रपटाची शुटिंग करत होता. गोरेगावच्या आरे कॉलनीमध्ये ही शुटिंग सुरू होती. परंतु, त्याला डेंग्यूची लक्षणं जाणवू लागली. त्यामुळे आता त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. आजारी असल्याने काही काळ त्याने शूटिंगमधून ब्रेक घेतला आहे.



डेंग्यूच्या गंभीर लक्षणांमुळे इमरानला डॉक्टरांनी कडक विश्रांती घ्यावी, असे सांगितले आहे. यामुळे ‘ओजी’ चित्रपटाच्या शूटिंगवर अनिश्चित काळासाठी ब्रेक लागण्याची शक्यता वाढली आहे. या ब्रेकमुळे चित्रपटाच्या वेळापत्रकावरही परिणाम होऊ शकतो, कारण हा प्रोजेक्ट २५ सप्टेंबरला रिलीज होण्याच्या तयारीत आहे.


ओजी’ या चित्रपटाद्वारे इमरान हाश्मी तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. या चित्रपटातून अभिनेता इमरान हाशमी आणि दाक्षिणात्य अभिनेता पवन कल्याण एकत्र पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री प्रियंका मोहन ही देखील मुख्य भूमिकेत असणार आहे. इमराने त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी आवारापन २ ची घोषणा केली होती. हा चित्रपट २०२६ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Comments
Add Comment

‘हक़’च्या यशानंतर यामी गौतम धरचं मन जिंकणारं वक्तव्य

या वर्षी दमदार अभिनय आणि मोठ्या पडद्यावर लक्षात राहणाऱ्या क्षणांनी भरलेल्या सिनेमांमध्ये एक नाव सातत्याने

मुखवट्यामागील गडद रहस्य ‘केस नं. ७३’

प्रत्येक चेहऱ्यावर एक मुखवटा असतो आणि या मुखवट्यामागे असतात सुखदुःखाच्या असंख्य मानवी भावभावना.. ज्या आपल्याला

हिंदवी पाटील आणि सुरेखा कुडची गाजवणार लावणीचा फड

लावणी म्हणजे महाराष्ट्राची शान... उत्तम संगीत आणि नखरेल अदाकारीने सजलेली लावणी रसिकांना घायाळ केल्याशिवाय राहत

‘दृश्यम ३’मधील कराराचा भंग केल्याप्रकरणी ‘धुरंधर’ अक्षय खन्नाला नोटीस

मुंबई : आगामी 'दृश्यम ३' या चित्रपटासाठी केलेल्या कराराचा भंग केल्याप्रकरणी अभिनेता अक्षय खन्ना याला कायदेशीर

सुपरस्टार थलापती विजयचा राजकारणासाठी फिल्मइंडस्ट्रीला रामराम; माझ्यासाठी महत्वाचे आहे कि....

मुंबई : दक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार थलापती विजयने अभिनय क्षेत्रातून बाहेर पडण्याचा मोठा निर्णय घेतला

अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल

हैदराबाद : 'झुकेगा नही' म्हणणारा अभिनेता कायदेशीर पेचात अडकला आहे. गेल्या वर्षी हैदराबादमध्ये 'पुष्पा २'च्या