Pune Traffic Update : सावधान पुणेकरांनो! एफसी रोडवर नियम तोडणाऱ्यांवर आता एआय कॅमेराचा डोळा!

  78

पुणे : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. पुण्यातील सर्वाधिक वर्दळीचा रस्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फर्ग्युसन कॉलेज (एफसी) रोडवर आता वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आधारित कॅमेरा सिस्टिम करडी नजर ठेवणार आहे. पुणे वाहतूक पोलिसांनी नुकत्याच त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर याबाबत माहिती दिली आहे. एफसी रोडवर आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आधारित कॅमेरा सिस्टिम द्वारे पोलिस करडी नजर ठेवणार आहेत. यामुळे नियम मोडणाऱ्यांवर त्वरित कारवाई करणे पोलिसांना शक्य होणार आहे.




रात्रीच्या वेळीही कार्यरत राहतात AI कॅमेरे


या नव्या तंत्रज्ञानामुळे नियम मोडणाऱ्यांना आता सहजासहजी सुटका मिळणार नाही. एफसी रोडवरील एआय- कॅमेरे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत. हे कॅमेरे वाहनांचे नंबर प्लेट स्कॅन करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना तात्काळ ओळखतात. सिग्नल तोडणे, चुकीच्या मार्गाने वाहन चालवणे, हेल्मेट न घालणे, किंवा गतीमर्यादा ओलांडणे यासारख्या गोष्टी या कॅमेरे सहज टिपतात. यामुळे पोलिसांना त्वरित कारवाई करणे शक्य होणार आहे. विशेष म्हणजे, हे कॅमेरे रात्रीच्या वेळीही अचूक काम करतात, ज्यामुळे चोवीस तास पाळत ठेवणे शक्य होईल.



मोबाईल नंबरवर चलान येणार


पुणे वाहतूक पोलिसांनी सांगितले की, AI कॅमेरांद्वारे ओळखले जाणारे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना दंडाची रक्कम थेट त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर SMSद्वारे पाठवली जाईल. यामुळे वाहतूक नियमांचे पालन करण्याची जबाबदारी वाहनचालकांमध्ये वाढेल आणि कारवाईत पारदर्शकता येईल. तसेच, वारंवार नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे. यामध्ये परवाना रद्द करणे किंवा अन्य कायदेशीर कारवाईचा समावेश असू शकतो.




चालकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन


एफसी रोड हा पुण्यातील सर्वात व्यस्त रस्त्यांपैकी एक आहे. येथे दररोज हजारो वाहने ये-जा करतात. यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन होण्याचे प्रमाणही अधिक आहे. पुणे वाहतूक पोलिसांनी सर्व वाहनचालकांना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे. हेल्मेट घालणे, सिग्नलचे पालन करणे, गतीमर्यादा राखणे आणि योग्य मार्गाने वाहन चालवणे यासारख्या साध्या गोष्टींमुळे रस्त्यावरील अपघात टाळता येतील आणि वाहतूक सुरक्षित होईल.

Comments
Add Comment

महादेवी हत्तिणीला ‘वनतारा’मध्ये पाठवण्याबाबतचा अहवाल

पेटा संस्थेमार्फत सत्यपरिस्थिती नमूद कोल्हापूर : महादेवी या हत्तिणीला कोल्हापूर मधील एका मठातून वनतारा येथे

हुंड्याऐवजी मुलींसाठी फिक्स डिपॉझिट

मराठा समाजाची लग्न आचारसंहिता अहिल्यानगर : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणानंतर मराठा समाजातील

डॉक्टरांसाठी ‘क्यूआर कोड’ प्रणाली अनिवार्य

बोगस डॉक्टरांना बसणार आळा पुणे : राज्यातील बोगस डॉक्टरांच्या वाढत्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी आता

भाऊरायांना राखी पाठवण्यासाठी पोस्ट ऑफिस सज्ज, पावसाची चिंता मिटली; राखीसाठी वॉटरप्रूफ लिफाफा

पुणे (वार्ताहर) : दूरगावी असणाऱ्या भावाला आपली प्रेमाची राखी पाठविण्यासाठी सध्या बहिणींची लगबग सुरू आहे. तसेच

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग

नितीन गडकरी यांच्या घराला बॉम्बने उडवण्याची धमकी; आरोपी ताब्यात

नागपूर:  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील निर्मानाधीन निवासस्थान बॉम्बने उडवण्याची