क्रिकेटच्या मैदानात धक्काबुक्की, खेळाडूंसह पंचांनाही ढकलले

ढाका : बांगलादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका युवा क्रिकेटपटूंचा कसोटी सामना सुरू असताना धक्कादायक घटना घडली. दोन्ही बाजूच्या खेळाडूंनी एकमेकांवर हात उगारला, धक्काबुक्की केली. यावेळी मध्यस्तीचा प्रयत्न करणाऱ्या पंचांनाही धक्काबुक्की झाली. भरपूर प्रयत्न करुन पंचांनी सर्व खेळाडूंना शांत केले आणि एकमेकांपासून दूर केले. यानंतर मैदानातील राडा थांबला. या प्रकरणात सामनाधिकाऱ्यांनी मैदानात उपस्थित असलेल्या दोन्ही पंचांकडून अहवाल मागवला आहे. सामनाधिकारी लवकरच दोन्ही बाजूच्या निवडक खेळाडूंवर कारवाई करण्याची शक्यता आहे.

रिपोनने एंतुलीच्या चेंडूवर षटकार मारला. नंतर दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये मैदानातच संघर्ष झाला. सुरुवातीला दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांकडे रागाने बघत होते. नंतर रिपोन नॉन स्ट्रायकर एंडला उभ्या असलेल्या त्याच्या जोडीदाराच्या दिशेने चालत जाऊ लागला. रिपोन चालत नॉन स्ट्रायकर एंडच्या जोडीदाराच्या दिशेने जात होता त्यावेळी एंतुलीने बडबड केली. यामुळे संघर्ष सुरू झाला. आधी धक्काबुक्की नंतर वादावादी आणि हाणामारी झाली. एंतुलीने रिपोनचे हेल्मेट काढून त्याच्याशी वाद घातला तर रिपोनने एंतुलीला बॅट दाखवत वाद वाढवला, प्रकरण चिघळू नये म्हणून पंचांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पंचांनाही धक्काबुक्की झाली.

रिपोन आणि एंतुलीमध्ये नेमका कशावरून वाद झाला ते अद्याप समजलेले नाही. पंचांनी मध्यस्थी करून सामना परत सुरू केला. तीन चेंडू झाल्यानंतर एंतुलीने फॉलो थ्रूमध्ये चेंडू अडवला आणि रिपोनच्या दिशेने भिरकावला. हा चेंडू रिपोने अडवला.समालोचकांनी दिलेल्या माहितीनुसार तीन चेंडू झाल्यानंतर एंतुलीने फॉलो थ्रूमध्ये चेंडू अडवला आणि रिपोनच्या दिशेने भिरकावला. हा चेंडू रिपोने अडवला.

रिपोन व एंतुलीमध्ये नेमका कशावरून वाद झाला ते अद्याप समजू शकलेलं नाही. तसेच हा राडा एवढ्यावरच थांबला नाही. पंचांनी मध्यस्थी करून सामना परत सुरू केला. एंतुलीने रिपोनचं हेल्मेट पकडून ओढलं. आता सामनाधिकारी या खेळाडूंवर काय कारवाई करतात ते बघू असे समालोकांन सांगितले.

Comments
Add Comment

न्यूझीलंडविरुद्धच्या रायपूर टी २० मध्ये भारताचा विजय, मालिकेत २-० अशी आघाडी

रायपूर : भारताने न्यूझीलंडविरुद्धची रायपूरमधील टी २० मॅच सात विकेट राखून जिंकली. या विजयासह भारताने पाच मॅचच्या

ग्रँड स्लॅम ४०० व्या विजयाच्या उंबरठ्यावर नोव्हाक जोकोविच!

ऑस्ट्रेलियन ओपनच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश मेलबर्न : टेनिस जगतातील महान खेळाडूंपैकी एक असलेल्या नोव्हाक

भारताचे विजयी आघाडीकडे लक्ष्य

रायपूरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध आज दुसरी टी-२० लढत रायपूर : नागपूरमध्ये मिळवलेल्या दणदणीत विजयानंतर, भारतीय

T20 World Cup मध्ये नव्या संघाची एन्ट्री होणार, बांगलादेशच्या बहिष्कारानंतर ICC लवकरच घोषणा करणार

ढाका : बांगलादेश क्रिकेट बोर्डाने भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या आगामी T20 वर्ल्ड कप २०२६ वर बहिष्कार घालत असल्याची

नागपुरात किवींचा धुव्वा उडवत भारताचा दमदार विजय

अभिषेक शर्मा, रिंकू सिंगच्या वादळी खेळीने मालिकेत १-० ने आघाडी नवी दिल्ली : भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही

ICC ODI Rankings: कोहलीचा अव्वल सिंहासनावरून पायउतार, डॅरिल मिशेल नंबर-वन

ICC ODI Rankings : आयसीसी वनडे क्रमवारीत मोठा आणि मनाला वेदना देणारा बदल पाहायला मिळाला असून भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी