कावेरी इंजिन : भारताचे आत्मनिर्भरतेकडे आणखी एक पाऊल!

शत्रूराष्ट्रांनी ऑपरेशन सिंदूरचा धसका घेतलाय. त्यातच आता भारताने स्वदेशी लढाऊ विमान तंत्रज्ञानात एक नवा अध्याय लिहिलाय. कावेरी इंजिन. हो बरोबर आहे. रशियामध्ये कावेरी इंजिनची यशस्वी चाचणी झालीय. हे इंजिन भारताच्या लढाऊ विमानांना बळ देणारं आहे आणि शत्रूराष्ट्रांना धडकी भरवणारं आहे. चला, जाणून घेऊया कावेरी इंजिन आणि त्याच्या वैशिष्ट्यांमुळे भारताची सामरिक शक्ती कशी वाढणार आहे.



भारतानं स्वदेशी लढाऊ विमान तेजस बनवलं,मात्र त्याच्या इंजिनासाठी परदेशी कंपन्यांवर अवलंबून राहावं लागत होतं. आता कावेरी इंजिननं ही कमतरता दूर केलीय. डीआरडीओ आणि जीटीआरई यांनी विकसित केलेलं हे टर्बोफॅन इंजिन लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट हे भविष्यातील घातक विमानांसाठी डिझाईन केलंय. रशियात झालेल्या चाचण्यांमध्ये कावेरी इंजिनचे चार व्हेरिएंट यशस्वी ठरले आहेत. फायटर जेटसाठी स्वदेशी इंजिन विकसित करण्यावर भारताने काम सुरू केलंय आणि या प्रोजेक्टच नाव आहे कावेरी इंजिन.


कावेरी इंजिन प्रोजेक्ट हा भारताच्या स्वदेशी फायटर जेटसाठी इंजिन बनवण्याचा एक प्रयत्न आहे. स्वदेशी फायटर जेटला शक्ती देण्यासाठी कावेरी इंजिन बनवलं गेलंय. कावेरी इंजिन योजनेची सुरुवात १९८०च्या दशकात सुरू झाली होती. मात्र काही अडचणींमुळे ती थांबली. आता डीआरडीओने २०१६मध्ये पुन्हा या योजनेवर काम सुरू केलं. कावेरी इंजिनमध्ये ४६kN ड्राय थ्रस्ट म्हणजे विमानाला पुढे ढकलण्यासाठी शक्ती आहे. तसंच तेजस आणि घातक यूसीएव्ही विमानांना ध्वनीपेक्षा जास्त गती आणि रडारवर न दिसणारी स्टेल्थ क्षमता आहे. शत्रूचे रडार भारताची विमानं शोधू शकणार नाहीत. कावेरी इंजिनमुळे तेजस विमानांना हवेतून हवेत, हवेतून जमिनीवर मारा करण्याची क्षमता वाढणार आहे.



कावेरी इंजिनमुळे भारत आता अमेरिका, रशिया, फ्रान्स, ब्रिटन आणि चीनच्या मोजक्या देशांच्या यादीत सामील होऊ शकणार आहे. ऑपरेशन सिंदूर यशस्वीपणे पार पाडणाऱ्या भारताने आता कावेरी इंजिनसह आपली सामरिक ताकद आणखी बळकट केलीय. त्यामुळे शत्रूराष्ट्रांना धडकी भरलीय. कावेरी इंजिन आणि त्याच्या यशस्वी चाचण्यांमुळे भारत आता शत्रूंना चोख प्रत्युत्तर देण्यास सज्ज झालाय. कावेरी इंजिन विकसित करून भारताने जगाला पुन्हा एकदा भारताची नवी उड्डाणशक्ती दाखवून दिलीय.

Comments
Add Comment

Andhra Pradesh Accident : आंध्र प्रदेशात खासगी ट्रॅव्हलची डंपरला जोरदार धडक; १३ जणांचा होरपळून मृत्यू

आंध्र प्रदेशातील मार्कापुरम जिल्ह्यात आज पहाटेच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली आहे. रायवरमजवळ एका खासगी

PM Narendra Modi : जगात मोदींचीच हवा! पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा बनले जगातील सर्वात लोकप्रिय नेते

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जागतिक स्तरावर सर्वाधिक लोकप्रिय नेते म्हणून समोर आले आहेत.

खराब जेवण देणं पडलं महागात, भारतीय रेल्वेने आकारला ६० लाख रुपयांचा दंड

मुंबई: भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. निकृष्ट दर्जाचे अन्न

रशियाकडून ६ कोटी बॅरल तेल खरेदी, एप्रिल महिन्यात होणार पुरवठा

नवी दिल्ली : आखाती देशातील युद्धस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताने रशियाकडून तब्बल ६ कोटी बॅरल तेलाची खरेदी केली

देशामध्ये १०० नवीन विमानतळ, २०० हेलीपॅड उभारणार, केंद्रीय मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत देशाच्या विमान वाहतूक, इमिग्रेशन आणि

देशभरात पेट्रोल-डिझेल, एलपीजीचा पुरवठा सुरळीत, सर्वपक्षीय बैठकीत सरकारची स्पष्टोक्ती

नवी दिल्ली  : पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठकीचे