१४ वर्षीय मुलाचा सर्पदंशाने मृत्यू

शहापूर : शहापूर तालुक्यातील पेंढरघोळ येथील प्रेम लहानू सदगीर हा १४ वर्षांचा मुलगा त्याच्या मित्रांसोबत क्रिकेट खेळत असताना सर्पदंश होऊन त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुख्य म्हणजे शहापूर उपजिल्हा रूग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने उपजिल्हा रुग्णालयांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.


मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास मित्रांसोबत प्रेम सदगीर हा क्रिकेट खेळत असतांना चेंडू झुडपात गेल्याने तो काढतांना साप चावल्याचे लक्षात आल्यावर त्याच्या पालकांनी तात्काळ त्याला रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारा दरम्यान प्रेमचा मृत्यू झाला.


एकुलत्या एक मुलाचा मृत्यू झाल्याने आई-वडीलांसह नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला या घटनेनंतर उपजिल्हा रूग्णालयात नातेवाईकांनी एकच गर्दी केली. दरम्यान नातेवाईकांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. तर या ठिकाणी रुग्णाला रूग्णालयात आणल्यानंतर त्याच्यावर व्यवस्थित उपचार करण्यात आले होते. त्याचे सीसीटीव्ही फुटेज देखील आहेत मात्र दुर्दैवी घटना घडल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

Comments
Add Comment

मच्छीमारांना आता क्यूआर कोडचे ओळखपत्र

हानिकारक मासेमारीवर बंदी नवीन नियमानुसार, एलईडीद्वारे मासे पकडणे, पेयर ट्रॉलिंग आणि बुल ट्रॉलिंगसारख्या

पालघर नगर परिषदेत तिरंगी लढतीची चिन्हे!

मोबिन शेख पालघर : आगामी पालघर नगर परिषद निवडणुकीत राजकीय समीकरणांमध्ये चुरस वाढली असून तिरंगी लढतीचे संकेत

विरार-अलिबाग कॉरिडोरचे काम सुरू होण्याच्या दिशेने एक पाऊल

चार तासांचा प्रवास केवळ दीड तासांत होणार मुंबई  : गेल्या ९ वर्षांपासून रखडलेल्या विरार-अलिबाग कॉरिडोरचे काम

खासदार डॉ. सवरा पालघरचे निवडणूक प्रभारी

आमदार राजन नाईक वसई-विरारचे निवडणूक प्रमुख पालघर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता

विरार-अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिकेच्या भूसंपादनाच्या कर्जास शासन हमी

मुंबई : विरार ते अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिकेच्या भूसंपादनासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला

पालघर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कामास गती देण्यासाठी वॉररुमध्ये हा प्रकल्प घेण्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांचे निर्देश

मुंबई : पालघरमधील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्याच्या परिसरातील