तोलानी चषक ज्युनियर आणि सब-ज्युनियर गटाच्या राष्ट्रीय ब्रीज स्पर्धेचे आयोजन

भारतीय संघासाठी निवड होणार; जागतिक ब्रीज स्पर्धेमध्ये पदक प्राप्त केलेल्या खेळाडूंचा सहभाग


नाशिक : महाराष्ट्र ब्रीज असोसिएशनआणि ब्रीज फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने नाशिकमध्ये २९ ते ३१ मे, २०२५ दरम्यान ज्युनियर आणि सब-ज्युनियर गटाच्या " तोलानी चषक " राष्ट्रीय ब्रीज स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तोलानी शिपिंग कंपनी यांनी पुरस्कृत केलेल्या या स्पर्धेचे आयोजन नाशिकच्या गंगापूर रोड, सोमेश्वर मंदिरजवळील गुप्ता गार्डन येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उदघाटन नाशिक ब्रीज असोसिएशनचे अध्यक्ष तथा ब्रीज या खेळाच्या प्रचार-प्रसार यासाठी कायमच कार्यरत असणाऱ्या मित्र विहार स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष विनोद कपूर यांच्या अध्यक्षतेखाली ब्रीजच्या ज्युनियर डेव्हलपमेंट कमिटीच्या चेअरमन अशोक भावनांनी आणि महाराष्ट्र ब्रीज असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. अविनाश देशमुख, खजिनदार प्रसाद होनप यांच्या हस्ते पार पडणार आहे.


यावेळी आंतरराष्ट्रीय पदकप्राप्त खेळाडू तथा संघटक आणि भारतीय ब्रीज फेडेरेशनचे उपाध्यक्ष तथा ज्युनियर खेळाडूंच्या डेव्हलपमेंट कमिटीचे सचिव आनंद सामंत, आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि प्रशिक्षक अनिल पाध्ये, महाराष्ट्र ब्रीज असोसिएशनचे सचिव तथा या स्पर्धेचे आयोजन प्रमुख हेमंत पांडे, नाशिक जिल्हा ब्रीज असोसिएशनचे अध्यक्ष मोहन उकिडवे, सचिव अतूल दशपुत्रे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेची तांत्रिक बाजू स्पर्धा संचाकल के. एस. स्वामिनाथन सांभाळणार आहेत.


या स्पर्धेमध्ये भारताच्या १५ विविध राज्यांच्या ९० खेळाडूंनी सहभाग नोंदवून चांगला प्रतिसाद दिला आहे. आंतरराष्ट्रीय ब्रीज फेडेरेशन यांच्या मार्गदर्शक नियमावलीनुसार १६ वर्षे, २१ वर्षे, २६ वर्षे आणि ३१ वर्षे मुले आणि मुली या चार वयोगटाचा या स्पर्धेमध्ये समावेश असणार आहे. या स्पर्धेमध्ये टीम चॅम्पिअनशिप, आणि पेअर्स प्रकार अश्या विविध प्रकारात ही स्पर्धा खेळविली जाणार आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंमध्ये सन २०२१ आणि सन २०२२ या वर्षी जागतिक ब्रीज चॅम्पिअनशिप स्पर्धेमध्ये सुवर्ण, रौप्य आणि कास्य पदके मिळविणाऱ्या खेळाडूंचा समावेश असणार आहे. त्यामुळे या स्पर्धेमध्ये चांगलीच चुरस दिसून येणार आहे.


भारतीय संघांची निवड - या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे खेळाडूंची भारताच्या संघासाठी निवड होणार आहे. हे निवड झालेले खेळाडू दिनांक ११ ते १७ जुलै, २०२५ दरम्यान इटली येथील सोल्सोमाज ओरे शहरात आयोजित जागितिक ब्रीज स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करतील अशी माहिती या स्पर्धेचे आयोजन प्रमुख तथा महाराष्ट्र ब्रीज असोसिएशनचे सचिव हेमंत पांडे यांनी दिली.

Comments
Add Comment

मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण का पाहिजे?

या प्रश्नाचे खरे उत्तर देण्याची छगन भुजबळ यांची मराठा समाजाच्या सुशिक्षित नेत्यांकडे मागणी नाशिक : मराठा

नाशिक इंडस्ट्रियलची डेस्टिनेशनकडे वाटचाल

सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूट टेस्टिंग लॅब ही ऊर्जा मीटर्स ट्रान्सफार्मसी ऑइल इन्सुलेशन प्रयोग शाळा, केबल,

पाहुणे आले आणि दागिने चोरून पसार झाले

नाशिक : घरात मुक्कामासाठी आलेल्या पाहुण्यांनी रात्रीच्या सुमारास घरातील १८ हजार रुपये किमतीचे दागिने चोरून

अंत्ययात्रेची तयारी झाली पण खोकल्याने वाचला तरुणाचा जीव!

नाशिक : अपघातामध्ये जखमी झालेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तरुण मृत झाल्याचा माहितीवरून परिवाराने

नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकुळ

त्र्यंबकेश्वर : नाशिक जिल्ह्यात पंधरा दिवसात विविध ठिकाणी तीन बिबट्यांना पकडण्यात वन विभागाला यश आले. जिल्ह्यात

कांदा खरेदी करूनही नाफेड' , एनसीसीएफने थकविले बळीराजाचे पैसे

नाशिक : राज्यामध्ये केंद्र सरकारच्या नाफेड आणि एनसीसीएफ या दोन संस्थांनी शेतकऱ्यांच्या कांदा खरेदी करून देखील