निफाडला विस्कळीत वीज पुरवठा सुरळीत

  29

वीज कर्मचारी व अधिकाऱ्यांचे अथक प्रयत्न

निफाड : सोमवारी सायंकाळी प्रचंड वादळी वाऱ्यांमुळे निफाड शहर आणि परिसरात एकच कहर उडून गेला. जोरदार पाऊस, वारा, वादळ यामुळे नेहमीप्रमाणे सर्वात मोठा फटका वीज वितरण व्यवस्थेला सोसावा लागला. मात्र, महावितरण कंपनीच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रचंड परिश्रम करीत अत्यंत कमी वेळात विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे शिवधनुष्य यशस्वीपणे पेलले.

झंझावाती वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी वीजवाहक तारा तुटून पडल्या. वाऱ्याचा वेग सहन न झाल्यामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळणे, फांद्या पडणे असे प्रकार घडले. वीज वाहक तारांवर झाडे पडली, तसेच काही ठिकाणी विजेचे खांब कोलमडून पडले. निफाड शहरामधील जवळपास ४० ट्रांसफार्मर बंद पडले होते. या सर्व गोष्टींचा अटळ परिणाम म्हणून शहर आणि परिसराचा विद्युत पुरवठा खंडित झालेला होता. मुख्य अभियंता सुंदर लटपटे, अधीक्षक अभियंता थूल व कार्यकारी अभियंता केशव काळूमाळी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि निफाड उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता निलेश नागरे यांनी केलेल्या शिस्तबद्ध नियोजनानुसार गर्द काळोख व रात्रीची वेळ असताना देखील सर्व यंत्रणा वेगाने हलवून तत्काळ सगळीकडे विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. शाखा अभियंता योगेश जाधव व त्यांच्या सर्व सहकारी कर्मचाऱ्यांनी टप्प्या टप्प्याने एक एक भाग पूर्ववत केला.

काळजीचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी ग्राहकांचे फोन आल्यास त्यांना वेळोवेळी विद्युत पुरवठा कधी येईल याबाबत अवगत केले जात होते. काही थोड्या ठिकाणांचा भाग सोडता अवघ्या काही तासातच संपूर्ण निफाडचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला. विद्युत वितरण कंपनीचे जनमित्र सर्वश्री टबाले, योगेश काळे, विशाल शिंदे, अमोल नागरे, किरण बागुल , सचिन आव्हाड, लाईम झाकरे तसेच निफाड नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी या सर्वांनी मेहनत घेऊन विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम यशस्वीरित्या पार पाडले. निफाड शहराबरोबरच कसबे सुकेणे, पिंपळस, नैताळे, नांदूर मधमेश्वर येथील विद्युत पुरवठा देखील तात्काळ दुरुस्त करण्यात आला.

Comments
Add Comment

‘सुखोई’च्या आवाजाने दिडोंरी थरथरली

घरांच्या काचा फुटल्या २५ किमी परिसरात आवाजाचे पडसाद स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण तलाठी, तहसीलदारांकडून

छगन भुजबळांनी दिला ध्वजारोहणाला नकार? हे आहे कारण

नाशिक: १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी झेंडा कोण फडकवणार? यावरून राज्यात वातावरण पेटलेले आहे. नाशिक आणि रायगड या दोन

इगतपुरीच्या रिसोर्टमधील कॉल सेंटरवर CBI चा छापा

अमेरिका, कॅनडासह परदेशी नागरिकांची फसवणूक नाशिक: इगतपुरी येथील रिसोर्टमधून विदेशी नागरिकांना फोन करून

स्ट्रॉबेरी पिकाचा पीक विमा योजनेत समावेश

कळवण : कळवण तालुक्यातील पश्चिम पट्टा आणि सुरगाणा तालुक्यातील घाटमाथा तसेच गुजरात सीमेलगतच्या सापुतारा

'मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी काँग्रेसने माफी मागावी'

मालेगाव : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील विशेष एनआयए न्यायालयाचा निकाल केवळ न्यायालयीन निर्णय नाही, तर तो एका

केळीच्या बागांत राहणाऱ्या वाघांना ओळख देण्यात वनविभागाचे अपयश

अनेर - मेळघाट काॅरीडॉर प्रकल्प प्रलंबितच… विजय पाठक जळगाव : जागतिक व्याघ्र दिनाच्या निमित्ताने वन्यजीव संरक्षण