न्याहाडी नदीचा पूल, बनलाय मृत्यूचा सापळा

नदीच्या पुलाला संरक्षण कठड्यांचा अभाव


मुरबाड :मुरबाड तालुक्यातील आदिवासी डोंगराळ भागात असलेल्या न्याहाडी, चासोळे व हेदवली पुलांना संरक्षक कठडे नाहीत, या पुलांवरुन दुर्गम भागातील विद्यार्थी, नोकरदार, शेतकऱ्यांना नाईलाजाने प्रवास करावा लागत आहे. मात्र अरुंद पुलामुळे वाहन चालकांना अंदाज येत नसल्याने वेळोवेळी अपघाताला सामोरे जावे लागत असल्याने हे पूल म्हणजे मृत्युचा सापळा बनले आहेत. प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याने परिसरातील हजारो संतप्त नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.


या पुलावरील नदीला पूर आल्यानंतर येथील गावांचा शहरांशी संपर्क तुटतो. तसेच पुलांना संरक्षक कठडा नसल्याने मोठी दुर्घटना घडण्याची भीती असते. पावसाळा सुरू होण्यापूर्वी हेदवली, चासोळे व न्याहाडी पुलावर संरक्षण कठडे न उभारल्यास करचोंडे, चासोळे, मेर्दी न्याहाडी व वाल्हीवरे ह्या ग्रामपंचायतीमधील सर्व नागरिकांच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभाग मुरबाड येथे उपोषण करून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मुरबाड तालुका शेतकरी सहकारी संघाचे माजी चेअरमन प्रकाश पवार, जिल्हा परिषद ठाणेचे माजी सदस्य संजय पवार, आदिवासी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ खाकर सर, मेर्दी ग्रामपंचायत सरपंच पांडुरंग दरवडा, सामाजिक कार्यकर्ते अशोक पठारे व संतोष देशमुख यांनी दिला आहे.



आदिवासी गाव-पाड्यामधील मोठ्या प्रमाणात नागरिक चासोळे,हेदवली व न्याहाडी पुलावरू न ये-जा करीत असतात. या तिन्ही पुलांवर संरक्षण भिंत किंवा लोखंडी रेलिंग उभारण्यासंबंधीचे पत्र १३ जुलै २०२३ रोजी समाजसेवक प्रकाश पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग ठाणे यांना दिले असताना आजपर्यंत कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही. हेदवली पुलाची अवस्था फारच दयनीय
झाली आहे.


सदर पुलावर होणारी वाहतूक आणि त्यामुळे वेळोवेळी होणाऱ्या अपघातावर मात करण्यासाठी लवकरच त्या पुलाचे दोन्ही बाजूला लोखंडी कठडे तयार केले जातील
- कैलास पतींगराव, उप अभियंता सार्वजनिक बांधकाम उप विभाग मुरबाड

Comments
Add Comment

उल्हासनगरच्या प्रभाग ६, ७ मध्ये कलानींचा वरचष्मा

सात जागा जिंकण्यात कलानींना यश उल्हासनगर : उल्हासनगरच्या पालिकेत आपला अस्तित्व अबाधित ठेवण्यात कलानी

प्रभाग १० मध्ये राष्ट्रवादीचा क्लीन स्वीप

नजीब मुल्ला, सुहास देसाईंसह चारही उमेदवार विजयी ठाणे : ठाणे महापालिका निवडणूक २०२६ चा निकाल जाहीर झाला. प्रभाग

मीरा-भाईंदरमध्ये भाजपची एकहाती सत्ता

१८ दिग्गज माजी नगरसेवकाचा पराजय भाईंदर : भारतीय जनता पक्षाने सन २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीची

मीरा-भाईंदर प्रभाग ३ मध्ये ॲड. तरुण शर्माची बाजी

भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत अवघ्या १५ मतांच्या फरकाने विजय मिळवून भाजपच्या उच्च शिक्षित

भिवंडी महापालिकेत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

भिवंडी : भिवंडी महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक ३० जागांवर विजय मिळवत मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला

कल्याण–डोंबिवलीत महापौरपदावर प्रश्नचिन्ह

शिवसेनेची अनपेक्षित मुसंडी कल्याण : कडोंमपा निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला असून, महापौरपद भाजपच्या हातातून