Marathi Movie Trailer: ‘आंबट शौकीन’ मधून मराठी कलाकारांची दमदार फौज प्रेक्षकांच्या भेटीला

धमाल चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित


तीन अतरंगी मित्रांची भन्नाट कहाणी सांगणाऱ्या ‘आंबट शौकीन’चा धमाल ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरमध्ये ललित, वरूण आणि रेड्डी हे तीन खट्याळ मित्र दिसत असून ते हसवण्यासोबत विचार करायलाही भाग पाडत आहेत. प्रेम, मैत्री, सोशल मीडियाच्या आभासी दुनियेत हरवलेली ओळख व मानसिक गुंतागुंत हे सगळे या चित्रपटात मांडण्यात आले आहे. सा तिघांच्या आंबटपणामुळे त्यांच्या आयुष्यात काय वादळ येणार, हे पाहाणे रंजक ठरणार आहे.



मातब्बर कलाकारांची फौज एकत्र 


येत्या १३ जून २०२५ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटात पूजा सावंत, अक्षय टंकसाळे, निखिल वैरागर, किरण गायकवाड यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्यांच्यासोबत प्रार्थना बेहेरे, भाऊ कदम, पार्थ भालेराव, अभिजीत खांडकेकर, मोनालिसा बागल, अमेय वाघ, चिन्मय संत, राहुल मगदूम यांच्यासह अनेक मातब्बर कलाकार झळकणार आहेत.


हेक्सव्हिजन एंटरटेनमेंट, एसएस अँड केएल ब्रदर्स प्रॉडक्शन्स, लॅब्रोस एंटरटेनमेंट आणि बिग ब्रेन प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘आंबट शौकीन’ चे दिग्दर्शन निखिल वैरागर यांनी केले आहे.


दिग्दर्शक निखिल वैरागर म्हणतात, “ ‘आंबट शौकीन’ ही फक्त मैत्री आणि प्रेम यांची धमाल गोष्ट नसून हलक्याफुलक्या व हास्यविनोदाच्या माध्यमातून मांडलेली अशी कथा आहे, जी आजच्या तरुणांच्या वास्तवाशी जोडलेली आहे. सोशल मीडियामुळे घडणारे भावनिक गुंतागुंतीचे परिणाम आणि त्यावर भाष्य करताना प्रेक्षकांना मनोरंजनातही अंतर्मुख करणे, हे आमचे उद्दिष्ट आहे.”


आंबट शौकीन’ या चित्रपटाची कथा निखिल वैरागर यांची असून प्रफुल्ल काकाणी, रंजना मोहित लखोटिया, अनघ भुतडा व निलेश राठी निर्माते आहेत. चित्रपटाची पटकथा आणि संवाद अक्षय टंकसाळे व अमित बेंद्रे यांचे आहेत. येत्या १३ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.



पहा ट्रेलर


Comments
Add Comment

सरपंच-उपसरपंचांची जुगलबंदी, शशांक शेंडे आणि ओंकार भोजने आमने-सामने

मुंबई : गावच्या राजकारणात सरपंच आणि उपसरपंच यांच्यातील नोक-झोक नेहमीच चर्चेचा विषय ठरते. आता ही रंगत

‘घबाडकुंड’ चित्रपट ठरणार मराठीतला पहिला युनिव्हर्स

मुंबई : हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये गाजलेल्या चित्रपटांच्या ‘युनिव्हर्स’ संकल्पनेची आता मराठी चित्रपटसृष्टीतही

अक्षय कुमारच्या भूतबंगला चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित, टीझर गुरुवारी प्रदर्शित होणार

मुंबई : बालाजी मोशन पिक्चर्सने भूतबंगला चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता

अमिताभ यांची अयोध्येत मालमत्ता खरेदी

अयोध्या : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत मालमत्ता खरेदी केली आहे. त्यांनी ‘हाऊस ऑफ अभिनंदन

करारी पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत पूजा सावंत

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत आघाडीच्या नायिकेला पोलिसांच्या वर्दीत पाहणं हे तसं दुर्मिळच. मात्र आगामी

अक्षय कुमार–प्रियदर्शन पुन्हा एकत्र; ‘रामजी आके भला करेंगे’ टीझरमध्ये पीक कॉमेडीची झलक

भूत, धमाल आणि ओजी स्वॅग: ‘भूत बंगला’मधील ‘रामजी आके भला करेंगे’ गाण्याचा टीझर रिलीज मुंबई : भूत बंगला हा २०२६ मधील