डीएड, बीएड असूनही बनल्या मदतनीस, सेविका!

...२२० पदवीधर महिलांचीही या नोकरीला पसंती


पालघर : शिक्षणाला महत्व आहेच, पण आजच्या काळात मिळेल त्या नोकरीला सुद्धा खूप महत्त्व आहे, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदासाठी झालेल्या भरती प्रक्रियेत हे वास्तव समोर आले आहे. डीएड, बीएडचे शिक्षण घेतलेल्या पालघर जिल्ह्यातील २८ महिलांनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदांची नोकरी स्वीकारली आहे. जिल्ह्यात रिक्त असलेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली.


महिला व बालविकास विभागाने राबविलेल्या पारदर्शक भरती प्रक्रियेत शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार उमेदवारांना गुण देण्यात आल्याने शैक्षणिक पात्रतेनुसारच अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांची निवड करण्यात आली आहे. दोन्ही पदांसाठी किमान १२ वी पास ही शैक्षणिक अहर्ता मागविण्यात आली होती. तसेच पदवीधर, पदव्युत्तर, डीएड, बीएड अशा प्रकारे शिक्षण घेतलेल्या आणि शासकीय मान्यता संस्थेचे संगणक परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र अथवा शासनाने ठरवून दिलेल्या संगणक अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र असणाऱ्या उमेदवारांना अतिरिक्त गुण देण्याबाबत नियम ठरवून देण्यात आला होता. त्याचप्रमाणे मार्कशीट मध्ये जेवढे जास्त गुण, या भरती प्रक्रियेची पात्रता ठरवतानाही तशाच प्रकारे उमेदवारांना जास्त गुण देण्याचा निकष लावण्यात आला.



उमेदवारांच्या मार्कशीट मध्ये ८० टक्के पेक्षा जास्त गुण असल्यास या प्रक्रियेत ६० गुण, मार्कशीट मध्ये ७० ते ८० टक्के गुण असल्यास ५५ गुण अशाचप्रकारे मार्कशीट मधील गुणांनुसार या प्रक्रियेत उमेदवारांना गुण देण्यात आले. विधवा, अनाथ महिला, अनुसूचित जाती जमाती मधील महिला, विशेष मागासवर्ग, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील महिला यांच्यासाठी अतिरिक्त गुण ठरविण्यात आले होते. या निकषांवर आधारित ही भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतून पदवीधर चे शिक्षण घेतलेल्या जिल्ह्यातील २२० महिलांनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदांची नोकरी स्वीकारली असून, डीएड तसेच बीएड चे शिक्षण घेतलेल्या २८ महिलांनी सुद्धा ७ आणि १० हजार रुपये मानधन असलेली ही नोकरी स्वीकारली आहे. किमान बारावी पास असलेल्या ३११ महिला या पदांसाठी पात्र ठरल्या आहेत. त्यामुळे या भरती प्रक्रियेने शिक्षणाचे महत्त्व तर पटवून दिले आहेच, त्यासोबतच नोकरीची गरज सुद्धा अधोरेखित केली आहे.



२५ सेविका आहेत पोस्ट ग्रॅज्युएट


अंगणवाडी सेविका म्हणून नोकरीला लागलेल्या या प्रक्रियेत २५ महिला ह्या उच्चशिक्षित पोस्ट ग्रॅज्युएट आहेत. यामध्ये कासा प्रकल्पांतर्गत ४, डहाणू ४, तलासरी २, पालघर २, मनोर २, मोखाडा ३, वसई १, वाडा ४ आणि विक्रमगड प्रकल्पा मध्ये असलेल्या अंगणवाड्यांमधील 3 महिलांचा समावेश आहे.




सेविका आणि मदतनीस पदासाठी राबविलेल्या पारदर्शक भरती प्रक्रियेत, शैक्षणिक पात्रतेला महत्त्व देण्यात आले.त्यानुसारच उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. रिक्त असलेली पदे भरण्यात आल्याने अंगणवाड्यांमधील कामकाजात आणखी सुधारणा होणार आहे.
- प्रवीण भावसार, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बालविकास विभाग ,जिल्हा परिषद पालघर


गावातील लहान बालके आणि महिलांशी सतत जुळलेल्या असणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची पदे पारदर्शकपणे भरली आहेत. या पदांसाठी उच्चशिक्षित महिलांच्या निवडीमुळे गाव पाड्यांच्या विकासास हातभार लागणार आहे.
- मनोज रानडे, (भा. प्र. से.) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पालघर.


Comments
Add Comment

वसई स्काय वॉकचा काही भाग कोसळला

वसई : वसई - विरार महानगरपालिका हद्दीत सध्या धोकादायक बांधकामे,उद्यान, नाल्यावरील स्लॅब कोसळण्याचा घटना सतत घडत

पालघरच्या किनाऱ्यावर ३ संशयास्पद कंटेनर आढळले! सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा

पालघर: जिल्ह्यातील किनारपट्टी भागात तीन संशयास्पद कंटेनर वाहून आल्याची बातमी समोर येत आहे. महामंडळाचे अधिकारी

Ganeshotsav 2025 : घोणसईत गणपतीबरोबर देशभक्ती! 'ऑपरेशन सिंदूर' देखावा ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू

गणेशोत्सवात देशभक्तीचा संगम – हर्षल पाटील यांचा देखावा ठरत आहे आकर्षणाचा केंद्रबिंदू पालघर : गणेशोत्सव २०२५

विरार इमारत दुर्घटनेत या १७ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये एक वर्षाच्या चिमुरडीचाही समावेश

विरार : विरार पूर्व येथील चामुंडानगरमधील रमाबाई अपार्टमेंट कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू

विरारमधील जुनी इमारत कोसळली, वाढदिवसाच्या कार्यक्रमावर काळजात धस्स करणारी घटना

विरार: गणेशोत्सवाचा आनंद सर्वत्र साजरा होत असताना, मुंबईजवळील विरारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. विरार

बेरोजगार उमेदवारांसाठी इस्राायल येथे रोजगाराची संधी

युवक-युवतींनी लाभ घेण्याचे आवाहन पालघर : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता