रायगड जिल्ह्यात ८ जूनपर्यंत जमावबंदी

अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना


अलिबाग : रायगड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या शिफारशीनुसार आणि अपर जिल्हादंडाधिकारी यांच्या आदेशानुसार ८ जूनपर्यंत मध्यरात्री १२ वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.


जिल्ह्यातील खालापूर, खोपोली, रसायनी, रोहा, माणगाव, महाड, नागोठणे, अलिबाग या औद्योगिक भागांमध्ये कामगार संघटनांकडून आंदोलन व संप पुकारले जात असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. याशिवाय धार्मिक व जातीय तणावाचे प्रसंग, तसेच आगामी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती (३१ मे), किल्ले रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्याला झेड प्लस दर्जाची सुरक्षा महाराष्ट्र सरकारने द्यावी, तसेच इतर विविध मागण्याकरिता किल्ले रायगडच्या पायथ्याशी बेमुदत धरणे आंदोलन (३१ मे) आणि छत्रपती शिवाजी महाराज ३५२ वा राज्याभिषेक सोहळा कार्यक्रम (६ जून) यामुळे देखील अस्थिरता उद्भवण्याची शक्यता लक्षात घेऊन ही अधिसुचना जारी करण्यात आली आहे.



आयोजित कार्यक्रम वगळले


या अधिसुचनेतून शासकीय अधिकारी, शासकीय कर्तव्यावरील कर्मचारी, तसेच शवयात्रा व अंत्यविधीसाठी जमणारा जमाव, आणि तहसीलदारांच्या परवानगीने आयोजित कार्यक्रम वगळण्यात आले आहेत. तहसिलदार किंवा कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यावरच कोणताही उत्सव, सभा, मिरवणूक आयोजित करता येणार असून, त्याची जबाबदारी आयोजकांची असणार असून, पोलीस व जिल्हा प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.



जमावबंदी दरम्यान या गोष्टींना बंदी


जमावबंदी दरम्यान शस्त्र, लाठ्या, सुरे, तलवारी इत्यादी वस्तू बाळगणे, स्फोटक किंवा ज्वलनशील पदार्थ घेऊन फिरणे, दगडफेक किंवा क्षेपणास्त्रे बाळगणे व तयार करणे, प्रतिमा किंवा आकृत्यांचे सार्वजनिक प्रदर्शन करणे, आक्षेपार्ह घोषणा, गाणी किंवा वाद्य वाजविणे, धोकादायक भाषण, हावभाव, चित्रप्रदर्शन पाच किंवा अधिक व्यक्तींचा जमाव परवानगीशिवाय जमविणे याला मनाई असणार आहे.

Comments
Add Comment

जिल्ह्यातील १८१ आदिवासी वाड्या रस्त्याविना

अलिबाग : आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहासोबत आणण्याचा आणि त्यांचा सर्वांगीण विकास घडवून यावा, या उद्देशाने

अवचित गडाचा मार्ग आता होणार सुखकर

खारापटीतील तरुणांनी केली रस्ता दुरुस्ती रोहा : ऐतिहासिक वारसा असलेल्या अवचित गडावर जाणाऱ्या रस्त्याची

लोकअदालतीतून वर्षभरात १९ संसारांचे पुनर्मिलन

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे समुपदेशन; तुटणाऱ्या नात्यांना नवसंजीवनी अलिबाग: बदलती जीवनशैली, वाढता ताणतणाव,

रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा आधारवड

८ महिन्यांत ६० रुग्णांना मिळाली मदत अलिबाग:रायगड जिल्ह्यातील गरीब, गरजू रुग्णांसाठी जिल्हास्तरीय मुख्यमंत्री

वर्षभरात ६२७ अपघातात २५८ जणांचा मृत्यू

रस्ते बनलेत मृत्यूचा सापळा; अपघातांना कारणीभूत धोकादायक वळणे, रस्त्यांची दुरवस्था वाहनांची वाढलेली वर्दळ,

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लांबणीवर

नांदगाव मुरुड : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याच्या