उत्तर कोरियाचा अणुयुद्धाचा इशारा

  99

नवी दिल्ली : जगभरात वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर उत्तर कोरियाने अमेरिकेच्या संरक्षणविषयक धोरणावर नाराजी व्यक्त करत अणुयुद्धाचा इशारा दिला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वात ‘गोल्डन डोम’ संरक्षण प्रणालीची आखणी करण्यात येत आहे. ही प्रणाली क्षेपणास्त्र हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी अवकाशात तैनात केली जाणार आहे. मात्र उत्तर कोरियाने या निर्णयाला आक्रमक विरोध दर्शवला आहे.


उत्तर कोरियाच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, अमेरिका युद्धसदृश परिस्थिती निर्माण करत आहे. जर त्यांनी तात्काळ आपली भूमिका बदलली नाही, तर अणुयुद्धाला कोणीही अडवू शकणार नाही. उत्तर कोरियाच्या सरकारच्या मते, ही प्रणाली केवळ अमेरिकेपुरती मर्यादित राहणार नाही. दक्षिण कोरिया आणि जपानसारख्या अमेरिकेच्या घट्ट सहयोगी राष्ट्रांमध्येही तिची स्थापना होण्याची शक्यता आहे. ही दोन्ही राष्ट्रे उत्तर कोरियाचे पारंपरिक प्रतिस्पर्धी मानली जातात.


उत्तर कोरियाला वाटते की, गोल्डन डोम मुळे या देशांची सुरक्षा वाढेल आणि उत्तर कोरियाची स्थिती कमकुवत होईल. उत्तर कोरिया वेळोवेळी जपान व दक्षिण कोरियाला लष्करी इशारे देत आला आहे. उत्तर कोरियाकडे आधुनिक शस्त्रास्त्रांचा मोठा साठा असूनही, गोल्डन डोम प्रणालीमुळे त्याचा प्रभाव कमी होईल, अशी भीती किम जोंग उन यांना वाटते.

Comments
Add Comment

दक्षिण कोरियात शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी

सियोल : दक्षिण कोरियामध्ये शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी घालणारे विधेयक मंजूर झाले आहे. मार्च २०२६ पासून हा कायदा

लंडनमध्ये भारतीय रेस्टॉरंटला आग; पाच जण जखमी

लंडन: लंडनमध्ये एका भारतीय रेस्टॉरंटमध्ये आग लावल्याची धक्कादायक घटना समोर

स्वातंत्र्यदिनी युक्रेनचा रशियाच्या अण्वस्त्र प्रकल्पावर ड्रोन हल्ला; मोठा स्फोट होऊन आग

मॉस्को: युक्रेनने रशियाच्या ऊर्जा प्रकल्पांवर पुन्हा एकदा मोठा ड्रोन हल्ला केला आहे. युक्रेनच्या स्वातंत्र्य

न्यूयॉर्कमध्ये भारतीयांना घेऊन जात असलेल्या बसला अपघात, पाच ठार

न्यूयॉर्क : अमेरिकेतून एक दुःखद बातमी आली आहे. न्यूयॉर्क राज्य महामार्गावर एका बसचा अपघात झाला. नायगरा

अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांवर धोक्याची टांगती तलवार, नियमांचे उल्लंघन केल्यास रद्द होणार व्हिसा

वॉशिंग्टन: अमेरिकेत स्थायिक झालेले किंवा तिथे व्हिसावर वास्तव्यास असलेल्या ५.५ कोटी परदेशी नागरिकांच्या

दक्षिण अमेरिकेत ८ रिश्टर क्षमतेचा भूकंप

वॉशिंग्टन डीसी : भारतीय वेळेनुसार शुक्रवारी सकाळी सात वाजून ४६ मिनिटांनी दक्षिण अमेरिकेत ८.० रिश्टर क्षमतेच्या