LSG vs RCB, IPL 2025: आयपीएल २०२५ साखळीतील शेवटचा सामना रॉयल चॅलेंजर्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स

  46

मुंबई(ज्ञानेश सावंत): आजचा सामना हा आयपीएल २०२५ साखळीतील शेवटचा सामना. लखनऊ सूपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु यांच्यात हा सामना रंगणार आहे. लखनऊ सुपर जायंट्स पात्रता फेरीतून बाहेर गेल्यामुळे उद्याचा सामना त्यांच्यासाठी फक्त औपचारिकता असणार आहे. अगोदरच सामन्यात लखनऊने गुजरातचा ३३ धावांनी पराभव केला त्यामुळे त्याचे मनोबल नक्कीच उंचावले आहे. मिचेल मार्शने तडाखेबाज फलंदाजी करून शतक ठोकले आणि संघाला विजय मिळवून दिला, तर दुसऱ्या बाजूला हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचा ४२ धावांनी पराभव केला.


आज बंगळूरुचा संघ नक्कीच जिंकण्यासाठी मैदानात उत्तरेल. गुण तक्त्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु तिसऱ्या स्थानावर आहे, पण अव्वल स्थान गाठायचे असेल तर आजचा सामना जिंकणे गरजेचे आहे. लखनऊ घरच्या मैदानावर खेळत असल्यामुळे त्यांचे पारडे जड आहे, पण रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु सहजा सहजी हार मानणारा संघ नाही. आजच्या सामन्यात विजय मिळवायचा असेल तर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुला गोलंदाजीवर मेहनत घ्यावी लागेल.


यश दयाल व लुंगी एनगीडी यांना चेंडूचा टप्पा अचूक ठेवावा लागेल. मिचेल मार्श फॉर्ममध्ये असल्यामुळे सुरुवातीच्या षटकात हाणामारी होऊ शकते. तसेच फलंदाजीमध्ये मयंक अग्रवाल आणि पाटीदार यांना मधल्या फळीत चांगली फलंदाजी करावी लागेल. रिषभ पंतसाठी कर्णधार म्हणून हा शेवटचा सामना आहे, एक मोठी खेळी करून तो शेवट गोड करू शकतो. चला तर जाणून घेऊयात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु अव्वल ठरते की लखनऊ शेवट गोड करते।

Comments
Add Comment

बॅडमिंटनपटू आयुष शेट्टीने रचला इतिहास

जिंकले पहिले बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर विजेतेपद नवी दिल्ली : भारताचा युवा बॅडमिंटनपटू आयुष शेट्टीने यूएस ओपन

'कॅप्टन कूल' या प्रसिद्ध टोपणनावाच्या ट्रेडमार्कसाठी धोनीचा अर्ज

नवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनीने 'कॅप्टन कूल' या नावासाठी ट्रेडमार्क अर्ज दाखल केला आहे. हे नाव चाहते त्याच्या थंड

Ravi Shastri on Shubhaman Gill: शुभमन गिलला ३ वर्षे कर्णधारपदी कायम ठेवा – रवी शास्त्री

लंडन: भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिलला पाठिंबा

आयसीसीकडून क्रिकेटच्या ६ नियमांमध्ये बदल

नवी दिल्ली : आयसीसीने क्रिकेटच्या नियमांमध्ये काही बदल केले आहे . हे नियम कसोटी, एकदिवसीय आणि टी २० क्रिकेटसाठी

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून