LSG vs RCB, IPL 2025: जितेश शर्माची बेधडक खेळी, आरसीबी टॉप २मध्ये

जयपूर: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या शेवटच्या साखळी सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लखनऊ सुपरजायंट्सला ६ विकेटनी हरवत पॉईंट्सटेबलमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. आरसीबीच्या विजयात जितेश शर्माची खेळी महत्त्वाची ठरली. त्याने ८५ धावांची बेधडक खेळी केल्याने आरसीबाला हा विजय साकारता आला. लखनऊने आरसीबाला विजयासाठी २२८ धावांचे आव्हान दिले होते. आरसीबीने हे आव्हान ६विकेट राखत पूर्ण केले आणि अव्वल स्थान मिळवले.

या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने पहिल्यांदा फलंदाजी केली. यावेळेस पंतने ठोकलेल्या शतकी खेळीच्या जोरावर लखनऊने पहिल्यांदा फलंदाजी करताना २१७ धावा केल्या आहेत.

पंतने आरसीबीविरुद्ध नाबाद ११८ धावा तडकावल्या. यादरम्यान त्याने ११ चौकार आणि ८ षटकार ठोकले. त्याच्या या जबरदस्त खेळीच्या जोरावर लखनऊला २२७ धावांचा डोंगर उभारता आला.

लखनऊची सुरूवात दमदार झाली. सलामीवीर मिचेल मार्शने ६७ धावा ठोकल्या. मॅथ्यू ब्रीट्झ्केने १४ धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेल्या पंतने फटकेबाजी करायला सुरूवात केली. त्याने ६१ बॉलमध्ये ११८ धावांची खेळी केली.

संपूर्ण हंगामात लखनऊचा पंत फॉर्ममध्ये दिसत नव्हता. मात्र आज त्याची लय काही वेगळीच आहे. त्याने १०व्या षटकांत २९ बॉलमध्ये अर्धशतक ठोकले. यासोबतच लखनऊची धावसंख्या १०० पार पोहोचवली. त्यानंतर १४व्या षटकांत मिचेल मार्शने ३१ बॉलमध्ये अर्धशतक ठोकले. हे त्याचे या हंगामातील सहावे अर्धशतक होते. ऋषभ पंतने १८व्या षटकांत ५४ बॉलमध्ये शतक ठोकले. त्याच्या खेळीच्या जोरावर लखनऊची धावसंख्या २०० पार पोहोचली.
Comments
Add Comment

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ध्रुव जुरेलचं पहिलं शतक! 'गन सॅल्यूट' करत केले सेलिब्रेशन

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा युवा यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव

IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताची घट्ट पकड, राहुल, जुरेल आणि जडेजाने ठोकले शतक

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी वेस्ट

IND vs WI: भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा, पहिल्याच दिवशी विंडीजचा संपूर्ण डाव कोसळला

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र

IND vs PAK : महिला क्रिकेट संघही पाकिस्तानी क्रिकेटपटूंशी हस्तांदोलन करणार नाही

नवी दिल्ली : दुबईतील आशिया कप दरम्यान भारतीय पुरुष क्रिकेट संघाप्रमाणे ५ ऑक्टोबर रोजी कोलंबो येथे होणाऱ्या

IND vs WI: शुभमन गिल पुन्हा ठरला 'अनलकी'! सलग सहाव्यांदा नाणेफेक गमावली

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये

अभिषेक शर्माने रचला इतिहास! ICC T20I फलंदाजी क्रमवारीत आजवरचे सर्वोच्च रेटिंग

नवी दिल्ली: भारताचा युवा आणि स्फोटक सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC)