मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपले

  31

शेतीसह अलिबाग शहरही पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत


अलिबाग : रायगड जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांना तुफानी पावसाने चांगलेच झोडपून काढल्याने गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात एकुण सरासरी सरासरी १६०.४५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे सर्वच तालुक्यांमधील सखल भाग, रस्ते, शेती आजही पाण्याखाली असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अलिबाग शहर समुद्रकिनारी असल्याने आणि दुसरीकडे समुद्राला मोठी भरती असल्याने अलिबाग शहरातील रस्ते, भाजी बाजारपेठ, पीएनपी परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, चेंढरे बायपास, अलिबाग ते पिंपळभाट दरम्यानचा रस्ता, शहरातील नाले, चेंढरे हद्दीतील नाले दुथडी भरून वाहताना दिसून येत होते. दुसरीकडे अलिबाग शहरासह जवळील चेंढरे हद्दीतील नाल्यांची व्यवस्थित सफाई न झाल्याने पाण्याबरोबरच नाल्यांतील कचरा रस्त्यांवर वाहून आल्याचे दिसून आले. ग्रामीण भागात उन्हाळ्यात रस्त्यावरील खड्डे न भरले गेल्याने त्यात पावसाचे पाणी साचल्याने त्याचा विविध प्रकारच्या वाहन चालकांना त्रास सुरु झाल्याचे चित्र दिसून येत होते.



जिल्ह्यात पंचनामा करण्याचे काम सुरू


दरम्यान, रायगड जिल्ह्यातील सर्व नद्या इशारा पातळीपेक्षा कमी प्रवाहात वाहत आहेत. दुसरीकडे गेल्या तीन दिवसात पडलेल्या मुसळधार पावसामुळे घरे, आरोग्य केंद्र, स्मशानभूमी, मच्छीमार सोसायटी, पोल्ट्रीसह गोठ्यांचे नुकसान झाले आहे. पंचनामे करण्याचे काम सुरू असून, आतापर्यंत एकूण १३ कच्च्या घरांचे, २६० पक्क्या घरांचे नुकसान झाले आहे. यामध्ये दोन आरोग्य केंद्र, दोन स्मशानभूमी, एक मच्छिमार सोसायटी एक पोल्ट्री व इतर पाच सार्वजनिक मालमत्तांचे समावेश आहे.



तालुक्यांमध्ये पावसाची नोंद


अलिबागला २४१, मुरुडला २५१, पेणला १६०, पनवेलला २४५.२, उरणला १००, कर्जतला १०३, खालापुरला १२३, माथेरानला १५२, सुधागडला १०२, माणगावला १३६, तळा १७४, महाडला ७८, पोलादपूरला ११८, श्रीवर्धनला १७०, म्हसळ्याला २८२, रोह्याला १३२ असा एकूण २५६७.२ मिलीमीटर (सरासरी १६०.४५) पाऊस पडला. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमधील सखल भाग, रस्ते, शेती आजही पाण्याखाली असल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.

Comments
Add Comment

प्रवीण ठाकूर यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश

रायगडमध्ये काँग्रेसला मोठा झटका अलिबाग : स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या आगामी निवडणुकांच्या आधी राज्यात

मुरुडच्या काशिद समुद्रकिनारी पंचावन्न लाखाेंचा चरस जप्त

नांदगाव मुरुड : गुप्त बातमीदारामार्फत मुरुड पोलिसांना ३१ जुलै रोजी मिळालेल्या माहितीनुसार मुरुड तालुक्यातील

एनएमएमटी बस कर्जत पूर्वेकडून सुटण्यास सुरुवात

शहरातील प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार विजय मांडे कर्जत : कर्जत पूर्वेकडील प्रवाशांसाठी आात बसची सुविधा उपलब्ध

पाली शहरात ३५ वर्षांनंतर अजूनही परिस्थिती ‘जैसे थे’

अष्टविनायक तीर्थक्षेत्राला शुद्ध पाणीपुरवठा योजनेची प्रतीक्षा अशी आहे जाहीर सूचना दिनांक ६/२/१९९० सालचे हे

रायगड पोलिसांनी केला ‘डिजीटल अरेस्ट’ रॅकेटचा पर्दाफाश

३५ मोबाईलसह ६१७५ सिमकार्ड जप्त, ११ आरोपींना अटक अलिबाग : वयोवृद्ध नागरिकांना फसवण्यासाठी ‘डिजीटल अरेस्ट’च्या

वन-वे व्यवस्थेत बदल घडल्याशिवाय पर्यटन क्रांती अशक्यच; ग्रामस्थांच्या नाराजीचा सूर

माथेरानमध्ये वीज, पाणी, वाहतूकही होते एकाच मार्गाने; स्थानिकांसह, पर्यटक, विद्यार्थ्यांचेही हाल माथेरान : १८५०