सैफ-सलमाननंतर आदित्य रॉय कपूरच्या घरातही घुसली अज्ञात महिला

  32

मुंबई: काही दिवसांपूर्वीच एक अज्ञात महिला आणि एका व्यक्तीने अभिनेता सलमान खान (Salman Khan) च्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये मध्यरात्री प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सुरक्षारक्षकांनी त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. तसेच काही महिन्यांपूर्वी सैफअली खान (Saif Ali Khan) च्या घरी एका चोरट्याने घुसून त्याच्यावर हल्ला चढवला होता. या दोन घटना कमी होत्या की काय, तर आता बॉलीवूडच्या आणखीन एका अभिनेत्याच्या घरात अज्ञात महिलेने घुसण्याचा प्रयत्न केला आहे. 'आशिकी 2' फेम आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapoor) सोबत हा प्रकार घडला आहे,  सदर महिला आदित्यची चाहती असल्याच म्हंटलं जातंय. कारण या महिलेने त्याच्यासाठी खास भेटवस्तू आणली होती, मात्र तो घरी नसल्यामुळे तिने तिथेच गोंधळ घातला.



बॉलीवूड अभिनेत्यांच्या घरी घुसखोरी करण्याच्या प्रकरणात आता आणखीन एक भर पडली आहे. ही घटना अभिनेता आदित्य रॉय कपूरच्या मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील घरी घडली.  बॉलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूरच्या घरात एका अज्ञात महिलेने प्रवेश केला. या महिलेने आदित्यसाठी भेटवस्तू आणि कपडे आणल्याचा दावा केला, मात्र नंतर त्या महिलेने घराबाहेर पडण्यास नकार दिला. तसेच तिने आदित्यच्या जवळ जाण्याचा देखील प्रयत्न केला. अखेर पोलिसांकडून या महिलेला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे सेलिब्रिटींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे.




आदित्य रॉय कपूरच्या मोलकरणीने सांगितली सर्व घटना


या संदर्भात आदित्य रॉय कापुरच्या मोलकरणीने खार पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, 26 मे रोजी आदित्य शूटिंगसाठी बाहेर गेला होता आणि त्याची मोलकरीण घरी एकटी होती. त्या दिवशी, संध्याकाळी 6 वाजता. दाराची बेल वाजली. दार उघडलं असता आदित्यच्या घरात घरकाम करणाऱ्या संगीता पवारने दार उघडलं तेव्हा तिच्यासमोर एक अनोळखी महिला उभी होती. त्या महिलेने हे आदित्य रॉय कपूरचे घर आहे का? अशी तिच्याकडे विचारणा केली. संगिताने त्या महिलेला येण्याचे कारण विचारले असता, तिने सांगितले की तिला आदित्यला काही भेटवस्तू आणि कपडे द्यायचे आहेत. महिलेच्या बोलण्यावर विश्वास ठेवून संगीताने तिला आत येऊ दिलं. या महिलेने तिचे नाव झकारिया सिद्दीकी अशी करून दिली जी 47 वर्षांची आहे. ती दुबईची रहिवासी असल्यांच तिने सांगितलं.


आदित्य रॉय कपूर जेव्हा घरी परतला तेव्हा संगीताने त्याला संपूर्ण घटनेची माहिती दिली. अभिनेत्याने या महिलेला ओळखण्यास नकार दिला आणि तिला घराबाहेर पडण्यास सांगितले. पण ती महिला तिथून निघायला तयारच नव्हती.  त्यानंतर आदित्यने सोसायटीच्या मॅनेजर जयश्री डुंकडू यांना कळवले, ज्यांनी आदित्यची मॅनेजर श्रुती रावला याबद्दल माहिती दिली. त्यानंतर या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन खार पोलिसांत याबाबत तक्रार करण्यात आली. या महिलेविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

राज ठाकरे यांच्या उपस्थितीत 'येरे येरे पैसा ३’ चा ट्रेलर लाँच थाटात संपन्न...

मराठी चित्रपटसृष्टीतील धमाल, ड्रामा आणि कॉमेडीने भरलेला बहुप्रतिक्षित चित्रपट ‘येरे येरे पैसा ३’ लवकरच

डोळे सुजलेल्या अवस्थेत चिन्मयी सुमितने सांगितलं हिंदी सक्ती विरोधात सहभागी न होण्याचं कारण..

हिंदी भाषा सक्तीचा जीआर शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी काढला. या जीआरनुसार मराठी भाषा इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत

झी टॉकीजचा अनोखा उपक्रम..विठोबा रखुमाईसाठी हाताने विणले जात आहे वस्त्र..

झी टॉकीजचा 'हँडलूम कॅन्टर' यंदाच्या वारीत सज्ज झाला आहे. सध्या फलटण फाट्याजवळ विठोबासाठी भक्तीचं वस्त्र विणलं

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनची झी मराठीच्या 'कमळी' मालिकेत एन्ट्री

मुंबई : अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलेल्या हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालनने तिच्या अभिनय

Phir Hera Pheri 3 : ये बाबुराव का स्टाइल है... अखेर ‘बाबू भैय्या’चं 'Phir Hera Pheri 3' मध्ये दणक्यात पुनरागमन!

अक्षय कुमार-प्रियदर्शन बरोबरच्या वादावर पडदा मुंबई : परेश रावल यांनी हेरा फेरी ३ चा वाद संपुष्टात आणत या

भारतीय रेल्वे अपघातांवर अभिनेते मिलिंद गवळींची उद्विग्न प्रतिक्रिया: "पाकिस्तान-बांग्लादेशपेक्षा बरी, पण..."

मुंबई: लोकप्रिय अभिनेते मिलिंद गवळी यांनी मुंबईतील वाढत्या रेल्वे अपघातांवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. सोशल